Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘जीपॅट’ स्पर्धेत संजीवनी बी. फार्मसीचे यश 

कोपरगाव : संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील ‘जीपॅट’ व ‘गेट’ परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या गुणवत्तेला पुन्हा अधोरेखित केले आहे. प्रथम बोहरा याने ‘जीपॅट’ परीक्षेत देशात ३१ वा क्रमांक पटकावला असून विशाल मुजमुले याने १५५४ वा क्रमांक मिळविला आहे. याचबरोबर ‘गेट’ परीक्षेत विशाल मुजमुले याने देशात ४४० वा क्रमांक मिळविला, तर प्रथम बोहरा याने १२३३ वा क्रमांक मिळवत दुहेरी यश मिळविले आहे. याशिवाय महाविद्यालयातील आणखी ११ विद्यार्थी ‘जीपॅट’ व २ विद्यार्थी ‘गेट’ परीक्षेत पात्र ठरले आहेत.  तसेच ‘गेट’ परीक्षेत प्रथम बोहरा याने लाईफ सायन्स विषयात देशपातळीवर ४० हजार ३५ विद्यार्थ्यांमधून १२३३ वा क्रमांक, तर बायोटेक्नॉलॉजी विषयात २१ हजार ५१३ विद्यार्थ्यांमधून ३१४० वा क्रमांक मिळविला आहे. विशाल मुजमुले यानेही ‘जीपॅट’मध्ये ५५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांमधून १५५४ वा क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. आता एम. फार्मसी अभ्यासक्रमासाठी एआयसीटीईकडून दरमहा १२ हजार ४०० रुपये स्टायपेंड मिळणार असल्याची माहिती प्रथम बोहरा यांनी दिली. संजीवनी संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे व डायरेक्टर डॉ. विपुल पटेल यांचे अभिनंदन केले. तसेच संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सत्कार केला. यावेळी पालक सचिन बोहरा, राखी बोहरा, बबन मुजमुले, हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. आर. एस. शेंडगे तसेच प्राध्यापक उपस्थित होते.

संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल  
संजीवनीच्या आठ विद्यार्थ्यांना तैवानमध्ये इंटर्नशिपची संधी
संजीवनी इंजिनिअरिंगच्या १२ विद्यार्थ्यांंना नोकरी

कोपरगाव : संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील ‘जीपॅट’ व ‘गेट’ परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या गुणवत्तेला पुन्हा अधोरेखित केले आहे. प्रथम बोहरा याने ‘जीपॅट’ परीक्षेत देशात ३१ वा क्रमांक पटकावला असून विशाल मुजमुले याने १५५४ वा क्रमांक मिळविला आहे.

याचबरोबर ‘गेट’ परीक्षेत विशाल मुजमुले याने देशात ४४० वा क्रमांक मिळविला, तर प्रथम बोहरा याने १२३३ वा क्रमांक मिळवत दुहेरी यश मिळविले आहे. याशिवाय महाविद्यालयातील आणखी ११ विद्यार्थी ‘जीपॅट’ व २ विद्यार्थी ‘गेट’ परीक्षेत पात्र ठरले आहेत. 

तसेच ‘गेट’ परीक्षेत प्रथम बोहरा याने लाईफ सायन्स विषयात देशपातळीवर ४० हजार ३५ विद्यार्थ्यांमधून १२३३ वा क्रमांक, तर बायोटेक्नॉलॉजी विषयात २१ हजार ५१३ विद्यार्थ्यांमधून ३१४० वा क्रमांक मिळविला आहे. विशाल मुजमुले यानेही ‘जीपॅट’मध्ये ५५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांमधून १५५४ वा क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. आता एम. फार्मसी अभ्यासक्रमासाठी एआयसीटीईकडून दरमहा १२ हजार ४०० रुपये स्टायपेंड मिळणार असल्याची माहिती प्रथम बोहरा यांनी दिली.

संजीवनी संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे व डायरेक्टर डॉ. विपुल पटेल यांचे अभिनंदन केले. तसेच संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सत्कार केला. यावेळी पालक सचिन बोहरा, राखी बोहरा, बबन मुजमुले, हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. आर. एस. शेंडगे तसेच प्राध्यापक उपस्थित होते.

COMMENTS