Homeताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज बहुजनांचे आधारवड आणि उत्तम शासक व प्रशासक होते – डॉ. वसुदेव गायकवाड

केज तालुक्यातील आनंदगाव येथील स्वानंद सार्वजनिक वाचनालयात दिनांक 26 जून 2026 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साज

आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण व स्वानंद सार्वजनिक वाचनालयात विविध स्पर्धाजागतिक सहकार दिन उत्साहात साजरा
आनंदगाव-सारणी रस्त्याची चाळण: गुडघाभर खड्ड्यांतून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; प्रशासनाचा निषेध
वसंतराव नाईक हरितक्रांतीचे प्रणेते; त्यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिन उत्साहात साजरा – डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड



केज तालुक्यातील आनंदगाव येथील स्वानंद सार्वजनिक वाचनालयात दिनांक 26 जून 2026 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन व अभिवादन करण्यात आले. यानंतर ग्रंथवाचन कार्यक्रम व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बहुजनांचे आधारवड राजर्षी छत्रपती शाहू महाराज या विषयावर ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवक व सुप्रसिद्ध वक्ते डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांचे व्याख्यान झाले. यावेळी बोलताना डॉ. वसुदेव गायकवाड म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे बहुजनांचे आधारवड तसेच उत्तम शासक आणि प्रशासक होते. त्यांनी समाजातील वंचित, दुर्बल आणि सामान्य घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. शाहू महाराजांनी गोरगरीब व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शाळा, वसतिगृहे उभारली. शिक्षणाची गंगा सामान्यांच्या घरापर्यंत पोहोचावी यासाठी त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. बहुजन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परदेशी शिक्षणासाठी त्यांनी आर्थिक मदत केली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची धर्मनिरपेक्ष राज्यघटना तयार केली. समाजकल्याणासाठी आयुष्य समर्पित करणारे राजर्षी शाहू महाराज हे महान व्यक्तिमत्त्व होते, असेही डॉ. गायकवाड यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौरी गायकवाड होत्या. परिसंवाद व ग्रंथवाचनामध्ये ऋषीकेश गायकवाड, कृष्णराजे गायकवाड, दर्शद गायकवाड, श्रुती पुंड, प्रतीक गायकवाड, आनंद गायकवाड यांनी सहभाग घेतला. दरम्यान, दिनांक 19 जून 2026 रोजी राष्ट्रीय वाचन दिवस देखील स्वानंद सार्वजनिक वाचनालयात ग्रंथवाचनाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजय सोनवणे व पांडुरंग गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमलाकर साबळे होते. या प्रसंगी लहान-थोरांनी ग्रंथवाचन केले. यामध्ये आनंद भैय्या गायकवाड, ए. बी. गायकवाड, जनार्दन गायकवाड, नारायण गायकवाड, कृष्णराजे गायकवाड, गौरी गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, शिवराज जाधव, रामराजे गायकवाड व आर्यन गायकवाड यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वानंद सार्वजनिक वाचनालयाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS