कोपरगाव : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) २०२६ मध्ये संजीवनी समूह संचलित संजीवनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उ

कोपरगाव : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) २०२६ मध्ये संजीवनी समूह संचलित संजीवनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रथमेश रवींद्र गोसावी याने ९९.९९ पर्सेन्टाइल गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला, तर सिद्धेश प्रशांत क्षत्रिय याने ९९.२० पर्सेन्टाइल गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. महाविद्यालयातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी ८० पेक्षा अधिक पर्सेन्टाइल गुण मिळवून गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
यंदाच्या परीक्षेत महाविद्यालयातील ३६ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक पर्सेन्टाइल, ६२ विद्यार्थ्यांनी ८५ ते ९० पर्सेन्टाइल, तर शंभर विद्यार्थ्यांनी ८० ते ८५ पर्सेन्टाइल गुण मिळविले. त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची सक्षम तयारी करून घेण्यात महाविद्यालयाला पुन्हा एकदा यश आले आहे.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांना खासगी शिकवणीवर अवलंबून राहण्यास प्रोत्साहन दिले जात नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, नियोजनबद्ध अध्यापन, नियमित सराव आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांच्या बळावर हे यश संपादन झाल्याचे महाविद्यालयाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या यशामागे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संपूर्ण संजीवनी परिवाराचे सामूहिक योगदान असल्याचेही त्यात म्हटले आहे.ग्रामीण भागातील शिक्षणसंस्थाही गुणवत्तेच्या बळावर राज्यस्तरावर ठसा उमटवू शकतात, हे या निकालातून पुन्हा अधोरेखित झाल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे, व्यवस्थापकीय विश्वस्त अमित कोल्हे, समूहाच्या संचालिका मनाली कोल्हे यांनी गुणवंत विद्यार्थी, पालक, शैक्षणिक प्रमुख डॉ. आर. एस. शेंडगे, प्राचार्या रेखा साळुंके तसेच सर्व विभागप्रमुख व शिक्षकांचे अभिनंदन केले.

COMMENTS