राज्यात उन्हाचा तडाखा वाढला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात उन्हाचा तडाखा वाढला

विविध शहरात ओलांडला तापमानाचा उच्चांक

पुणे/प्रतिनिधी : देशभरात मार्च महिना हा तब्बल 122 वर्षानंतर म्हणजे एका शतकानंतर सर्वाधिक उष्णतेचा महिना म्हणून नोंद करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात

स्व. दिलीप गांधी यांनी अर्बनच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार दिला : खा.सुजय विखे
महाराष्ट्राच्या राजकारणात होणार उलथापालथ ? संजय राऊत – शरद पवारांची भेट सांगतेय काय ? l पहा LokNews24
भाच्याच्या मदतीने मावशीने सासूचा काटा काढलाl LokNews24

पुणे/प्रतिनिधी : देशभरात मार्च महिना हा तब्बल 122 वर्षानंतर म्हणजे एका शतकानंतर सर्वाधिक उष्णतेचा महिना म्हणून नोंद करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात देखील उन्हापासून काही दिलासा मिळेल, अशी अपेक्षा अजिबात नाही. कारण एप्रिल महिन्यातच अनेक शहरात तापमान 42-43 अंशावर पोहचले असून, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानूसार राज्यातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यातील तीव्र उन्हाळ्यानंतर आता एप्रिलही अंगाची लाहीलाही करणार असा अंदाज व्यक्त आहे. पुण्यात दिवसाचे तापमान 39.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. मात्र एप्रिल दोन दिवसात महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या काही दिवसात शहरातील तापमान 40 अंश सेल्सिअस पार करेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील पुण्यात किमाल तापमान 39.7 अंश सेल्सिअस आहे तर सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे 43.5 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. विदर्भात निर्माण झालेली उष्णतेची लाट आणखी दोन दिवस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अकोला, चंद्रपूर, या परिसरात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणच्या कमाल तापमानाने 40 अंशाचा टप्पा पार केला आहे. याबरोबरच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात येत्या 6 व 7 एप्रिलला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

COMMENTS