Homeताज्या बातम्याअहमदनगर

माका येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. गायकवाड रुजू

माका : नेवासा तालुक्यातील माका येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग-१ पदावर डॉ. अमोल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील पशुपालकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.माका येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाल्याने पशुधनाच्या आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून शेतकरी व पशुपालकांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. रुजू झाल्यानंतर डॉ. गायकवाड यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. अमोल गायकवाड यांनी पशुपालकांना पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत मिळणाऱ्या सुविधा तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. पशुधनाचे आरोग्य, लसीकरण, उपचार व पशुसंवर्धन योजनांबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. या प्रसंगी महालक्ष्मी हिवरे, पाचुंदे, तेलकुडगाव, देडगाव येथील पशुपालक ग्रामस्थ तसेच कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. सत्यजित तांबे यांनी मांडला पहिल्या 100 दिवसांच्या कामाचा लेखाजोखासंगमनेर शहराच्या शाश्वत विकासासाठी कटिबद्ध, नागरिकांचा सहभाग वाढला
कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द कराअकोलेत किसान सभेची निदर्शने
गोदावरी महामंडळ कार्यालय स्थलांतराचा विखेंचा ‘बालहट्ट’खा. निलेश लंके ; निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ  

COMMENTS