Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयसीयूमध्ये उंदीर चावल्याने रूग्णाचा मृत्यू

पुणे ः पुणे शहरातील स्टेशन भागातील नामांकित शासकीय रुग्णालय असलेल्या ससून रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाचा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उंदी

शिवसेना महिला नेत्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला 
महिलेची हत्या करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या | LOK News 24
‘बीबीसी’च्या कार्यालयात ‘प्राप्तिकर’चे छापे

पुणे ः पुणे शहरातील स्टेशन भागातील नामांकित शासकीय रुग्णालय असलेल्या ससून रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाचा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उंदीर चावल्याने दुर्देवीरित्या मृत्यु झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. सागर रेणुसे असे मयत झालेल्या रुग्णाचे नाव आहे. या घटनेनंतर ससून रुग्णालयात खळबळ उडाली असून मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात जमण्यास सुरुवात केल्याने तणाव निर्माण झाला.
ससून रुग्णालयातील ट्रामा सेंटर मध्ये संबंधित रुग्ण हा अपघात झाल्यानंतर औषध उपचारासाठी काही दिवसांपूर्वी दाखल झालेला होता त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना शासकीय ससून रुग्णालयात रुग्णांचे आरोग्यासाठी हेळसांड होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. सागर रेणुसे याला ससून रुग्णालयातील आयसीयूनमध्ये सी वॉर्डमध्ये बेड क्रमांक 15 वर उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉड बॉय यांचे लक्ष्य नसल्याने थेट रुग्णास अतिदक्षता विभागातच सोमवारी रात्री सागर रेणुसे यांच्या डोक्यास उंदीर चावून कुरतडल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे मयत रुग्णाचे नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी करत याप्रकरणी रुग्णालयावर तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास देखील मनाई केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान,याबाबत ससून रुग्णालयाने त्यांची बाजू मांडलेली नाही. ससून रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांकडे योग्य प्रकारे लक्ष दिले जात नसल्याच्या अनेक तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून वारंवार करण्यात येतात. मात्र ,त्यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. हा सगळा प्रकार माहित होताच ससून रुग्णालयात अनेक नातेवाईक जमले होते. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांवर उंदीर चावल्याचे आरोप केले. मात्र बराच वेळ डॉक्टरांनी हा आरोप मान्य केला नाही. ज्यावेळी नातेवाईकांनी गोंधळ घातला त्यावेळी त्यांनी उंदीर चावल्याचं मान्य केलं. हा प्रकार पाहून नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले होते. सागर रेणूसेचा फक्त अपघात झाला होता. योग्य उपचार होऊन सागर बरा होईल, अशी नातेवाईकांना अपेक्षा होती. काही प्रमाणात गंभीर मार लागल्याने त्याला ससूनमधील आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. मात्र ससून रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे आणि भोंगळ कारभारामुळे सागरचा जीव गेला. 30 वर्षाचा असलेला सागर अचानक गेल्याने त्याच्या कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे. या प्रकरणी नातेवाईक आता कोणतं पाऊल उचलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

COMMENTS