अर्धापूर: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँ

अर्धापूर: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहन काँग्रेस नेते अशोक बुटले यांनी केले.
लोणी येथील भाजपचे माजी सरपंच अशोक बुटले यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि युवा नेते पप्पू पाटील कोंढेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशानंतर अर्धापूर तालुका काँग्रेसच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. अर्धापूर येथे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण घोषणांनी बुटले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष सुनील वानखेडे, तालुका प्रभारी डॉ. उत्तमराव इंगळे, माजी सभापती मिर्झा अख्तरउल्ला बेग, प्रल्हाद सोळंके, सुभाष लोणे, बळीराम पाटील हट्टेकर, अरविंद पाटील क्षीरसागर, शेख मकसूद, बालाजी जंगीलवाड, रवींद्र डाढाळे, दिगंबर पाटील, पृथ्वीराज लोणे, रमेश भुसे, मोहम्मद इब्राहिम, अॅड. गौरव सरोदे, अॅड. नितेश लोणे, मोहम्मद गौस खुरेशी, फेरोज पठाण, कु. शबाना बेगम, शेख शकील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध पदाधिकार्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी गावपातळीवर जनसंपर्क वाढविण्याचे आवाहन केले. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठे यश मिळवून देण्यासाठी सर्वांनी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

COMMENTS