Homeताज्या बातम्या

८० मोजा आणि पाणी प्या! किनवटमध्ये दुधाच्या दरवाढीसोबत भेसळीचा ’धंदा’ जोरात; अन्न व औषध प्रशासन कुंभकर्णी झोपेत?

किनवट: एकीकडे महागाईच्या झळा सोसणार्‍या किनवटच्या जनतेला आता दुधाच्या भरमसाठ दरवाढीसोबतच आरोग्याशी खेळणार्‍या जीवघेण्या भेसळीचाही सामना करावा लाग

विजेच्या खेळखंडोब्यामुळे बेलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत; महावितरणच्या गलथान कारभारावर ग्रामस्थ संतप्त
झाडे लावा-झाडे जगवा; पण वाढलेली झाडे वाचविणार कोण?राजुरीवेस ते माळीवेस मार्गावरील झाडांची मोठ्या प्रमाणात छाटणी; नागरिकांमध्ये नाराजी
कोयत्याने वार करून जबरी चोरी करणार्‍या टोळीला बीड एलसीबीने ठोकल्या बेड्या; इंदापूरमधून तीन आरोपी गजाआड

किनवट: एकीकडे महागाईच्या झळा सोसणार्‍या किनवटच्या जनतेला आता दुधाच्या भरमसाठ दरवाढीसोबतच आरोग्याशी खेळणार्‍या जीवघेण्या भेसळीचाही सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षी ५० रुपयांवरून ७० रुपये प्रतिलीटर झालेल्या दुधाचे दर आता थेट ८० रुपये प्रतिलीटर करण्यात आले आहेत. मात्र, धक्कादायक बाब अशी की, ८० रुपये मोजूनही नागरिकांना शुद्ध दूध मिळत नसून, केवळ पाणी मिश्रित आणि घातक घटकांची भेसळ असलेले पांढरे पाणी विकले जात आहे. ’जर पाणी मिश्रित दुधाला ८० रुपये मोजावे लागत असतील, तर शुद्ध दूध मिळवण्यासाठी नागरिकांना तब्बल १२० रुपये मोजावे लागतील की काय?’ असा संतप्त सवाल आता सामान्य जनता विचारत आहे.

या बेकायदेशीर दरवाढीमुळे आणि वाढत्या भेसळखोरीमुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे दूध उत्पादक आणि किरकोळ दुकानचालक कमालीचे हैराण झाले आहेत. संकलन केंद्रांवर गुणवत्ता नियंत्रण मापकानुसार पशुपालकांना पैसे दिले जातात, मात्र बाजारात विक्री करताना काही महाभाग पाकीटबंद दुधातही पाणी मिसळून किंवा बनावट दूध तयार करून ग्राहकांची सर्रास लूट करत आहेत. दुभती जनावरे नसतानाही सिलबंद पाकिटांच्या दुधाची खुल्या दुधात भेसळ करून विकणारे काही टोळके आज मोकाट फिरत आहेत. त्यामुळे या भेसळखोरांवर थेट ’मकोका’अंतर्गत कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

महसूल, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या नाकाखाली हा काळाबाजार राजरोसपणे सुरू आहे. दुग्धजन्य पदार्थांची कोणतीही तपासणी केली जात नसल्याने भेसळखोरांचे मनोबल कमालीचे वाढले आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या या टोळ्यांना नेमके कोणाचे पाठबळ आहे? असा टोकदार प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत. या भोंगळ कारभाराविरुद्ध थेट वरिष्ठ पातळीवर पुराव्यासह तक्रार केली जाईल आणि जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. आता तरी प्रशासन जागे होणार की भेसळखोरांचे उखळ पांढरे करत राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS