Homeकृषी

तेलंगणा-आंध्रकडे बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांचा वाढता कल; स्थानिक कृषी सेवा केंद्रांवरील विश्वासाला तडा?

भोकर: तालुक्यातील अनेक शेतकरी कापूस व सोयाबीन बियाण्यांच्या खरेदीसाठी शेजारील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील कृषी सेवा केंद्रांकडे वळत असल्याचे चित

वारीतील २३ वर्षीय तरुण वाघोलीतून बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन
“आमचा एकही आमदार फुटणार नाही!” – खासदार शरद पवारांचा बारामतीत ठाम विश्वास
मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ; ६ ऑगस्टला आष्टीत भव्य आरोग्य मेळावा
शेतकऱ्यांनो! बियाणे खरेदी करतांना 'ही' काळजी घ्या; कृषी विभागाकडून आवाहन |  Navarashtra

भोकर: तालुक्यातील अनेक शेतकरी कापूस व सोयाबीन बियाण्यांच्या खरेदीसाठी शेजारील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील कृषी सेवा केंद्रांकडे वळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. स्थानिक बाजारपेठेतील विक्रेत्यांपेक्षा बाहेरील राज्यांतील कृषी सेवा केंद्रांवर अधिक विश्वास दाखवत अनेक शेतकरी तेथून बियाण्यांची खरेदी करत आहेत. काही ठिकाणी यासाठी मध्यस्थ किंवा दलाल कार्यरत असल्याचीही चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे.

मात्र, राज्याबाहेरून खरेदी करण्यात येणार्‍या बियाण्यांसंदर्भात शेतकर्‍यांकडे अधिकृत पावती, परवानाधारक विक्रेत्याचा पुरावा आणि आवश्यक कागदपत्रे आहेत का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भविष्यात बियाण्यांची उगवण कमी झाली, पिकांचे नुकसान झाले किंवा उत्पादन घटले तर त्याची जबाबदारी निश्चित करणे अवघड ठरू शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

शेतकर्‍यांच्या मते, मागील काही वर्षांत बोगस बियाणे, निकृष्ट दर्जाची खते व कीटकनाशके तसेच उगवण क्षमतेबाबतच्या तक्रारी वाढल्याने स्थानिक कृषी सेवा केंद्रांवरील विश्वास काही प्रमाणात कमी झाला आहे. कृषी तज्ज्ञांनी मात्र शेतकर्‍यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. कोणतेही बियाणे खरेदी करताना परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी, अधिकृत बिल घ्यावे, अन्यथा नुकसान झाल्यास तक्रार नोंदविणे कठीण होऊ शकते. शेतकर्‍यांचा विश्वास पुन्हा मिळविण्यासाठी कृषी विभागाने प्रभावी नियंत्रण व जनजागृती उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.

COMMENTS