Homeताज्या बातम्या

किनवटजवळ चिखली शिवारात वीज कोसळून १५ वर्षीय बालकाचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी

किनवट: तालुक्यात २३ जून रोजी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसात एक भीषण दुर्घटना घडली आहे. चिखली बु. शिवारात अंगावर वीज पडल्याने

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गेवराई शाखेच्या सदस्यपदी सुरेश आहेर यांची नियुक्ती
जंतर-मंतरवर पुन्हा वाढली आंदोलनाची धार; हजारो विद्यार्थी जमले एकत्र, पोलिसांचा मोठा ताफा तैनात
आंदोलनकर्त्यांच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी राष्ट्रपतींना निवेदन : सोमनाथ मोहिते
Nanded News | वीज कोसळून १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू ; किनवट  तालुक्यातील चिखलीवर शोककळा

किनवट: तालुक्यात २३ जून रोजी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसात एक भीषण दुर्घटना घडली आहे. चिखली बु. शिवारात अंगावर वीज पडल्याने शेख रशीद शेख मुक्रम (वय १५) या मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर या घटनेत अन्य तीन मुले गंभीर जखमी झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारनंतर किनवट परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. याच दरम्यान चिखली शिवारात वीज कोसळून शेख रशीद याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत शेख अखिद शेख फिरोज (वय १५) आणि शेख सयान शेख सर्फराज (वय १४) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

याशिवाय, शेख अबीद शेख फिरोज (वय १६) हा तिसरा मुलगाही या घटनेत जखमी झाला असून, त्याच्यावर गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने घटनेचा रीतसर पंचनामा केला असून, आवश्यक कार्यवाहीचा प्राथमिक अहवाल तहसील कार्यालयामार्फत सादर करण्यात आला आहे. १५ वर्षांच्या निष्पाप बालकाचा वीज पडून मृत्यू झाल्याने संपूर्ण किनवट तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS