Homeताज्या बातम्या

नेकनुर येथील एसबीआय एटीएम चार महिन्यांपासून बंद; नागरिकांचा बँक प्रशासनाविरोधात संताप

नेकनुर: येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे एटीएम मागील चार महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने ग्राहकांसह नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जा

प्रा. शरद खिल्लारे यांची दक्षिण आफ्रिकेतील अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये ऐतिहासिक कामगिरी; पटकावले मानाचे ‘बिल रोवन’ पदक
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पंकजाताई मुंडे यांची सांत्वनपर भेट; कै. किसनराव मोहोळ यांना वाहिली श्रद्धांजली
ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट! ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा दिमाखात शुभारंभ

नेकनुर: येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे एटीएम मागील चार महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने ग्राहकांसह नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. डिजिटल व्यवहारांच्या युगातही स्वतःचे पैसे काढण्यासाठी नागरिकांना इतर ठिकाणी धाव घ्यावी लागत असल्याने बँक प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

व्यापारी, वृद्ध आणि रुग्णांचे हाल; बाजारपेठेवर परिणाम

नेकनुर परिसरातील हे एटीएम नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानले जाते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून तांत्रिक बिघाड किंवा रोख रकमेचा अभाव अशा कारणांमुळे येथील सेवा पूर्णपणे ठप्प आहे. एटीएम बंद असल्याचा मोठा फटका स्थानिक व्यापारी, दुकानदार आणि ग्राहकांना बसत असून बाजारपेठेतील व्यवहारांवर याचा विपरीत परिणाम होत आहे. ऐन गर्दीच्या काळात नागरिकांना पैशांसाठी इतर गावांतील एटीएमवर अवलंबून राहावे लागत आहे. तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांना पैशांची व्यवस्था करण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारक आणि महिला ग्राहकांनाही बँकेच्या रांगेत तासनतास उभे राहून त्रास सहन करावा लागत आहे.

आंदोलनाचा इशारा

स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वी अनेक वेळा बँक प्रशासनाकडे तोंडी तसेच लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्षात एटीएम सेवा सुरू करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. “आम्ही आमचेच पैसे काढण्यासाठी दुसऱ्या गावातील एटीएमवर का अवलंबून राहायचे?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत एटीएम सेवा पूर्ववत सुरू न केल्यास बँकेसमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नेकनुरमधील नागरिक आणि ग्राहकांनी दिला आहे.

COMMENTS