Homeताज्या बातम्या

कर्तव्य बजावताना मनमानी केल्याचा आरोप; महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांची अखेर बदली

केज: येथील महावितरण कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांच्या कार्यपद्धतीविरोधात नागरिक, विविध संघटना, पक्ष पदाधिकारी, ग्राहक तसेच काही ग्र

भवानी चौक ठरू लागला अपघाताला निमंत्रण
काळेगाव हायस्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के7 विद्यार्थिनींची 90 टक्क्यांहून अधिक गुणांची कमाई
खोट्या गुन्ह्याप्रकरणी दोषी पोलीस अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करा; खा. बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

केज: येथील महावितरण कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांच्या कार्यपद्धतीविरोधात नागरिक, विविध संघटना, पक्ष पदाधिकारी, ग्राहक तसेच काही ग्रामपंचायतींकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर अखेर शितल सय्यद यांची केज येथून बीड येथे बदली करण्यात आली आहे. या बदलीमुळे केज शहर ‘पेशवाईच्या जाचातून मुक्त’ झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते लखन हजारे यांनी केला आहे.

बदलीला विरोध केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

सामाजिक कार्यकर्ते लखन हजारे यांनी सांगितले की, कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांच्या कारभारामुळे केज शहरासह ग्रामीण भागातील नागरिक आणि काही कर्मचारी त्रस्त झाले होते. याप्रकरणी वेळोवेळी निवेदने देऊन आंदोलनाद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली होती. वरिष्ठ प्रशासनाने या तक्रारींची दखल घेत बदलीचे आदेश काढले असून त्यांना बीड येथे रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. शितल सय्यद यांचा केज येथील कार्यकाळ वादग्रस्त राहिला असून, या बदलीला जर कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला, तर केज तालुक्यातील नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लखन हजारे यांनी दिला.

दरम्यान, एका अपंग व्यक्तीने आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन केले असताना संबंधित प्रकरणात महावितरण कार्यालयात परवानगी न घेता पत्रकार परिषद घेतल्याचा तसेच सोशल मीडियावरील काही संदेशांमुळे भावना दुखावल्याचा आरोपही हजारे यांनी केला असून या सर्व तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांनी बदलीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

केजमध्ये नेमके दडलंय तरी काय?

शितल सय्यद यांनी त्यांच्या मोबाईलवर ‘घाबरू नका, मी पुन्हा येणार’ अशा आशयाचा संदेश पाठवल्याचा दावा लखन हजारे यांनी केला आहे. या संदेशाबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी, “केजमध्ये नेमके काय दडलं आहे?” असा सवाल आता उपस्थित केला आहे.

COMMENTS