Homeताज्या बातम्या

घाटसावळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरायोग समृद्ध आयुष्याची गुरुकिल्ली – चंद्रकांत फड

श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था संचलित जनसेवा व्यसनमुक्ती केंद्र व लोकनेते गोपीनाथराव मुंडे वृद्धाश्रम, घाटसावळी येथे 12 वा आंतरराष्ट्रीय यो

हॉटेलमधील‘बनावट’ पनीर वापरल्यास कारवाई
निवारा केंद्रात सात दिवसीय योग शिबिर उत्साहात संपन्न
न्यायालय लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देतेय ?



श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था संचलित जनसेवा व्यसनमुक्ती केंद्र व लोकनेते गोपीनाथराव मुंडे वृद्धाश्रम, घाटसावळी येथे 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी फड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला भाजप युवा नेते तथा योग दिनाचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत फड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन फड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सूर्य नमस्काराने करण्यात आली. यावेळी जनसेवा व्यसनमुक्ती केंद्रातील लाभार्थ्यांना प्राणायाम, ध्यानधारणा व योगासनांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच लोकनेते गोपीनाथराव मुंडे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यदायी जीवनासाठी प्राणायामाचे महत्त्व समजावून सांगत योगाभ्यासाचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना चंद्रकांत फड म्हणाले, नियमित योगाभ्यासामुळे शरीर आणि मन निरोगी राहते. योग ही समृद्ध व संतुलित आयुष्याची गुरुकिल्ली आहे. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने उपस्थित लाभार्थ्यांना अल्पोपहार व फळांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आजिनाथ शेरकर, वर्षा शेरकर, गिताराम गायकवाड, अमोल नेहरकर, सहदेव फड, संजय फड, रामनाथ मुळे, गोरख फड यांनी परिश्रम घेतले. पसायदान व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

COMMENTS