शिक्षक बँकेच्या निवडणुकीने दिले सव्वा लाखाचे उत्पन्न ; साडेआठशेवर उमेदवारी अर्ज दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षक बँकेच्या निवडणुकीने दिले सव्वा लाखाचे उत्पन्न ; साडेआठशेवर उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीला येथील जिल्हा सहकार उपनिबंधक कार्यालयाला तब्बल सव्वा लाखाचे उत्पन्न मिळवून दिले

शेतकरी आणि वीज वितरण अधिकारी यांच्यामध्ये अड.प्रताप ढाकणे यांनी घडवून आणली चर्चा
*तुमचे आजचे राशीचक्र बुधवार,१६ जून २०२१ l पहा
जलजीवन मिशन योजनतेतील कामांमध्ये घोटाळा

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीला येथील जिल्हा सहकार उपनिबंधक कार्यालयाला तब्बल सव्वा लाखाचे उत्पन्न मिळवून दिले आहे. दरम्यान, या निवडणुकीत गुरुवारी (23 जून) अखेरच्या दिवशी 144 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक रिंगणात उतरलेल्या एकूण उमेदवारांची संख्या 852 झाली आहे. या अर्जांची आज शुक्रवारी (24 जून) छाननी होणार आहे व 11 जुलैपर्यंत माघारीची मुदत आहे. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी 24 जुलैला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी तब्बल 1 हजार 266 उमेदवारी अर्ज विकले गेले आहेत. ही निवडणूक घेणार्‍या जिल्हा सहकार उपनिबंधक कार्यालयाने उमेदवारी अर्जाची किंमत 100 रुपये केली होती. या पार्श्‍वभूमीवर 1266 उमेदवारी अर्ज विकले गेल्याने यातून 1 लाख 26 हजार 600 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात 17 जूनला झाली होती व त्या पहिल्याच दिवशी 719 अर्जांची विक्री होऊन 71 हजाराचे उत्पन्न मिळाले होते. नंतरच्या चार दिवसात रोज सव्वाशे ते दीडशे कोर्‍या अर्जांची विक्री होऊन आणखी सुमारे 55 हजारांची भर तिजोरीत पडली आहे. दरम्यान, विकलेले अर्ज व दाखल झालेले अर्ज पाहता सुमारे 67 टक्के अर्ज इच्छुकांकडून वापरले गेले आहेत. अर्थात बहुतांश उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरले आहेत.

यंदा विक्रमी अर्ज दाखल
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक तब्बल सव्वा वर्षे उशिराने होत आहे. मागच्या वर्षीच ही निवडणूक अपेक्षित होती. मात्र, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे सावट असल्याने ही निवडणूक त्यावेळी झाली नाही व सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. मात्र, आता कोरोनाचे सावट दूर झाल्याने यंदा निवडणूक होत आहे. पण शिक्षक बँकेच्या निवडणूक इतिहासात यंदा पहिल्यांदाच विक्रमी 1266 उमेदवारी अर्जांची विक्री झाली व त्यापैकी 852 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे यापैकी छाननी किती उडतात व त्यानंतर 11 जुलैपर्यंतच्या माघारीच्या मुदतीत कितीजण रणछोडदास होतात, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर माघारीपर्यंत तब्बल 15 दिवसांचा अवधी असल्याने या काळात उमेदवारांची फोडाफोडी व माघारीसाठीचे विनवणी नाट्य रंगणार आहे व त्याचवेळी दुसरीकडे प्रत्यक्ष निवडणूक लढतीत उतरवल्या जाणार्‍यांची नावे निश्‍चित करण्याचे आवाहन शिक्षक मंडळांच्या नेत्यांसमोर असणार आहे.

मतदारसंघ निहाय उमदेवारी अर्ज
संगमनेर 46, नगर 41, पारनेर 42, कोपरगाव 25, राहाता 28, श्रीरामपूर 37, जामखेड 40, पाथर्डी 43, राहुरी 26, शेवगाव 25, श्रीगोंदा 41, अकोले 27, नेवासा 41, कर्जत 31, मनपा-नपा-भिंगार कॅन्टोन्मेंट 36, अनुसूचित जाती-जमाती 65, महिला राखीव 103, इतर मागासवर्ग-ओबीसी 90 आणि एनटी 65 असे 852 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

COMMENTS