Homeताज्या बातम्या

टाकळी-कदमवाडी शिवारात २५ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या; केज-बीड राष्ट्रीय महामार्गावर थरार, शहरात तणावपूर्ण शांतता

केज: तालुक्यातील टाकळी-कदमवाडी शिवारात पूर्ववैमनस्यातून २५ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केज-ब

नेकनुर येथील एसबीआय एटीएम चार महिन्यांपासून बंद; नागरिकांचा बँक प्रशासनाविरोधात संताप
विलास घुले मृत्यू प्रकरणाचा निष्पक्ष तपास करा; दोषींवर कठोर कारवाई करा – ना. पंकजाताई मुंडे
जिल्हा न्यायालय बीड येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा! दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन
Beed Murder Case: धक्कादायक! भांडण सोडवायला गेला आणि जीव गमावून बसला –  Prahaar.in

केज: तालुक्यातील टाकळी-कदमवाडी शिवारात पूर्ववैमनस्यातून २५ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केज-बीड राष्ट्रीय महामार्गावरील रेणु बारसमोर झालेल्या या हत्येने परिसरात खळबळ उडाली असून, घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. विलास नवनाथ घुले (वय २५, रा. टाकळी, ता. केज) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मृताचा भाऊ रमेश नवनाथ घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हॉटेलवरील वादातून थरार

विलास घुले आणि त्याचा भागीदार आकाश चाळक हे टाकळी फाटा ते कदमवाडी फाटा दरम्यान ‘हॉटेल गावकरी’ चालवत होते. २० जून २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आरोपी पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून हॉटेलवर आले आणि त्यांनी तेथे उपस्थित उमेश माने याला मारहाण सुरू केली. जीव वाचवण्यासाठी उमेश माने केजच्या दिशेने पळाला असता, विलास घुले आणि त्याचा चुलत भाऊ नितीन घुले त्याच्या मागे धावले. केज-बीड रोडवरील रेणु बारसमोर आरोपींनी त्यांना गाठले आणि “तू मध्ये का पडतोस?” असे म्हणत आरोपी रामेश्वर गायकवाड याने विलास घुलेच्या पोटात चाकूने वार केले. गंभीर जखमी विलासचा अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान २१ जून रोजी मृत्यू झाला.

दोन आरोपी गजाआड; इतरांचा शोध सुरू

घटनेनंतर केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने तपास करत २२ जून २०२६ रोजी पहाटे दोन आरोपींना अटक केली. यामध्ये बाबासाहेब गोरोबा उर्फ गोरख कदम (वय ४०, रा. कदमवाडी) आणि संतोष नरहरी कदम (वय ४५, रा. कदमवाडी) यांचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१) (खून), १०९, १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यातील मंगेश गोरख कदम, भैय्यासाहेब गायकवाड, अजय उर्फ बँकटी कदम, नवनाथ कदम आणि दीपक कदम यांच्यासह इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. फरार आरोपींचा शोध घेणे, हत्येसाठी वापरलेले चाकू आणि स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्निल सोनवणे स्वतः करत आहेत.

COMMENTS