Homeताज्या बातम्या

हिंदू स्वाभिमानाच्या रक्षणासाठी आता घराबाहेर पडा; उमापुरात होणार विराट जनआक्रोश मोर्चा!

सकल हिंदू समाजाला विश्व हिंदू परिषद, बीडचे आवाहन बीड : गेवराई तालुक्यातील ब्रह्मगाव येथे जागृत मारुतीरायाच्या विटंबना व गोहत्या सारख्या घटनेने

महायुतीतील अस्वस्थता!
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील : आमदार विवेक कोल्हे; रयतच्या एसएसजीएम महाविद्यालयात भव्य सत्कार संपन्न
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी रायगडावर लाखो शिवभक्त उपस्थित राहणार : माधवराव देवसरकर
मुंबईत उद्या हिंदू जनआक्रोश मोर्चा - Marathi News | Mumbai Tarun Bharat

सकल हिंदू समाजाला विश्व हिंदू परिषद, बीडचे आवाहन

बीड : गेवराई तालुक्यातील ब्रह्मगाव येथे जागृत मारुतीरायाच्या विटंबना व गोहत्या सारख्या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची प्रचंड लाट उसळली असून हिंदू समाजाच्या श्रद्धा, अस्मिता आणि स्वाभिमानावर झालेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवार, दि. १९ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता उमापूर येथे विराट ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. सकल हिंदू समाज, बीड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चामध्ये जिल्हाभरातील हजारो हिंदूंनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन विश्व हिंदू परिषद, बीडच्या वतीने करण्यात आले आहे.

हिंदू समाजाच्या श्रद्धास्थानांची विटंबना करून धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार सातत्याने घडत असतील, तर त्याविरोधात आता संपूर्ण हिंदू समाजाने संघटित होऊन ठाम आणि तीव्र भूमिका घेण्याची वेळ आली असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. हा मोर्चा कोणत्याही एका संघटनेचा नसून हिंदू समाजाच्या अस्तित्व, श्रद्धा आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठीचा एकजुटीचा एल्गार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

या विराट मोर्चाला आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर तसेच डॉ. धवलसिंहजी मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती सोबतच जिल्ह्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. हिंदू समाजाच्या विविध प्रश्नांवर तसेच श्रद्धास्थानांच्या संरक्षणासाठी पुढील दिशा यावेळी मांडण्यात येणार आहे.

विश्व हिंदू परिषद, बीडच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनात म्हटले आहे की, हिंदूंच्या श्रद्धेवर वार करणाऱ्यांना आता समाजाची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. हिंदू समाज सहनशील आहे, पण असहाय्य नाही. श्रद्धास्थानांचा अपमान, देवतांची विटंबना आणि हिंदूंच्या भावना दुखावण्याचे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्ती, शहर आणि परिसरातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, शेतकरी तसेच सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उमापूर येथे उपस्थित राहून हिंदू एकतेचे विराट दर्शन घडवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आता मौन नाही, तर संघटित हिंदू शक्तीचा आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे. श्रद्धा, संस्कृती आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी प्रत्येक हिंदूने घराबाहेर पडले पाहिजे. हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन हिंदू समाज एकसंघ असल्याचा ठाम संदेश संपूर्ण राज्याला द्यावा, असे आवाहन विश्व हिंदू परिषद, बीडच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS