Homeताज्या बातम्या

बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; डेहराडूनमध्ये प्रचंड तणाव, जाळपोळ आणि दगडफेक; ४ आरोपी अटकेत

डेहराडून : उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यातील विकासनगर परिसरात बजरंग दलाशी संबंधित एका पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर परिसरा

अंजनापूर ग्रामस्थांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार; कोपरगाव येथील ग्रामसंवाद कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची ग्वाही
राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा काँग्रेसकडून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन; माजी नगरसेवक अमर शेख यांची माहिती
राहुरी विटंबना प्रकरण: आरोपीचा सुगावा देणाऱ्यास पोलिसांकडून ११ हजारांचे बक्षीस; शिवप्रेमींकडून मात्र सवाल

डेहराडून : उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यातील विकासनगर परिसरात बजरंग दलाशी संबंधित एका पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. या घटनेनंतर संतापलेल्या जमावाने काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने परिसरातील इंटरनेट (अंमतरजाल) सेवा पुढील आदेशापर्यंत खंडित केली असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

सहसपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैरागीवाला गावात दोन गटांतील जुन्या वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हत्येचे वृत्त पसरताच परिसरात तणाव वाढला आणि संतप्त जमावाने आरोपींच्या घरावर हल्ला करत जाळपोळ केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस दलासह प्रादेशिक सशस्त्र पोलीस पथक (PAC) तैनात करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी १२ नामनिर्देशित आणि ३० ते ३५ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत चार मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. प्रशासनाने संबंधित आरोपींच्या मालमत्तेवरही कारवाई केली आहे.

मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या एक दिवस आधी बांधकाम साहित्याच्या व्यवहाराशी संबंधित सुमारे १४ हजार रुपयांच्या देवाणघेवाणीवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला होता. शनिवारी सायंकाळी पैशांची देवाणघेवाण सुरू असताना दोन्ही बाजूचे लोक एकत्र आले आणि वाद विकोपाला गेला. याच वेळी शेतातील पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावरूनही वाद वाढल्याचे सांगितले जात आहे. या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि झालेल्या हल्ल्यात विनोद कुमार हे गंभीर जखमी झाले. डोक्यावर झालेल्या गंभीर प्रहारामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत त्यांच्या कुटुंबातील आणखी तीन सदस्य जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परिसरात कडकडोटी सुरक्षा

घटनेनंतर रविवारी सकाळपासून गावात तणावपूर्ण वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. संवेदनशील भागांत पोलीस गस्त वाढवण्यात आली असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजसह विविध पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले असून हत्येमागील नेमके कारण आणि जबाबदार व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला असला तरी परिसरात अद्यापही संशयाचे वातावरण आहे.

COMMENTS