Homeताज्या बातम्या

रामनाथजी राजपुरे यांची भेंडा कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड

https://www.youtube.com/watch?v=66xxgR2yJho लोकनेते मारुतराव घुले पाटील ' ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या होऊ घातलेल्या निवड

अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी राजकारण तापले आ.गोपीचंद पडळकरांच्या कथित व्हिडिओवरून चौंडीत संतापाची लाट
अहिल्यानगरमध्ये ट्रॅव्हल्स जिहादविरोधात एकवटला हिंदू समाज
वडलोपार्जित रस्ता आडविल्याने शेत जमीन पडीक ठेवण्याची वेळ

लोकनेते मारुतराव घुले पाटील ‘ ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत बालमटाकळी येथील सेवा संस्थेचे चेअरमन रामनाथजी राजपुरे यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांची बालमटाकळी येथे भव्य मिरवणूक काढून ठिक ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला ,
माजी आमदार नरेंद्र पाटील घुले , माजी आमदार चंद्रशेखर पाटील घुले , पंचायत समितीचे माजी सभापती क्षितिज भैया घुले यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वर शेतकरी पॅनल चे सर्व संचालक बिनविरोध निवडून आले ,
सत्काराला उत्तर देताना रामनाथजी राजपूरे म्हणाले की , लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या बरोबर आजवर मी एकनिष्ठ राहिल्याने व त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने वेगवेगळ्या संस्थांवर मला आजवर काम करण्याची संधी घुले बंधुंनी उपलब्ध करून दिली , त्यांचे ऋण फेडणे अशक्य असून शेतकऱ्यांचे ऊसाचे प्रश्न या निमित्ताने सोडवणे मला शक्य होणार असल्याने मी या पदाचा वापर शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने करणार असल्याचे राजपुरे म्हणाले ,
पाऊस चालू असताना देखील ग्रामस्थ मोठ्या संख्येने मिरवणुकीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

COMMENTS