Homeताज्या बातम्या

अंजनापूर ग्रामस्थांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार; कोपरगाव येथील ग्रामसंवाद कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची ग्वाही

कोपरगाव : तालुक्यातील अंजनापूर येथे आयोजित 'ग्रामसंवाद' कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. ग्रामस्थांनी

कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार आशुतोष काळेंकडून जोरदार स्वागत
कोपरगावात निळवंडेचे पाणी आमदार आशुतोष काळे यांच्यामुळेच आले; माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे यांचा दावा
Dr. Pankaj Ashiya : १० पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये  'अंतर्गत तक्रार समिती' अनिवार्य: जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया | I Love Nagar  | News Portal

कोपरगाव : तालुक्यातील अंजनापूर येथे आयोजित ‘ग्रामसंवाद’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. ग्रामस्थांनी मांडलेल्या विविध स्थानिक समस्यांवर सर्व शासकीय विभागांशी तातडीने समन्वय साधून जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी आमदार आशुतोष काळे प्रामुख्याने उपस्थित होते.

उपलब्ध विकासनिधी व तांत्रिक बाबींचा विचार करून गावातील प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी स्पष्ट केले. या महत्त्वपूर्ण बैठकीत रस्ते, वीज व पाणी या मूलभूत सुविधांवर सविस्तर चर्चा झाली. कोपरगाव-संगमनेर रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तातडीने कार्यवाही केली जाईल. तसेच महावितरणच्या रोहित्रांच्या (ट्रान्सफॉर्मर) समस्या आणि पाणीवाटपाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी महसूल प्रशासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

गावात बँक शाखा आणि मोबाईल नेटवर्क नसल्याने होणारी गैरसोय दूर करण्यासाठी दूरसंचार विभागाकडे अधिकृत प्रस्ताव पाठवला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी विशेष शिबिरे आयोजित करून शासकीय ओळखपत्र अद्ययावतीकरण, शिधापत्रिका व आयुष्मान भारत योजनेशी संबंधित कामे मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की, अंजनापूर परिसराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी निळवंडे प्रकल्प व गोदावरी कालव्याचा मोठा फायदा होत आहे. सावळीविहीर ते कोल्हार मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २० कोटी रुपये मंजूर असलेल्या झगडे फाटा ते तळेगाव दिघे राज्य मार्गाचे काम प्राधान्याने पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी यंत्रणांना दिल्या. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी डॉ. बाबासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार महेश सावंत, सरपंच कविता गव्हाणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS