Homeताज्या बातम्या

मेजर नंदकुमार सैंदाणे यांचा आदर्श युवकांना प्रेरणादायी : ह.भ.प. भागवतराव मुठे पाटील

श्रीरामपूर : भारतीय आर्मीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर कठीण परीक्षा व प्रशिक्षणानंतर मेजर नंदकुमार संतराम सैंदाणे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी (PSI) नि

महायुतीतील अस्वस्थता!
व्यापाऱ्यांवरील ६० टक्के भाडेवाढ आणि डिपॉझिटविरोधात माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांचा आमरण उपोषणाचा इशारा
उखलगाव येथील शाळेस तातडीने शिक्षक द्या; श्रीगोंद्यात पालक व ग्रामस्थांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
मेजर नंदकुमार सैंदाणे यांची पीएसआय (PSI) पदी नियुक्ती - Lokmanthan | लोकमंथन

श्रीरामपूर : भारतीय आर्मीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर कठीण परीक्षा व प्रशिक्षणानंतर मेजर नंदकुमार संतराम सैंदाणे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी (PSI) निवड होऊन श्रीनगर येथे त्यांची नेमणूक झाली. हा त्यांचा श्रमशील जीवनप्रवास, देशभक्ती आणि समाजसेवा वृत्तीचा आदर्श आजच्या युवकांना प्रेरणादायी असल्याचे मत श्रीमद् भागवत कथाकार ह.भ.प. भागवतराव मुठे पाटील यांनी व्यक्त केले.

मेजर नंदकुमार सैंदाणे यांच्या सत्कारप्रसंगी बोरावकेनगर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. प्रारंभ प्रतिष्ठानचे संस्थापक-सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी मान्यवरांची ओळख करून दिली.

याप्रसंगी आंतरभारती श्रीरामपूर शाखा अध्यक्ष माजी प्राचार्य सुभाष लिंगायत, वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये, माजी मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण, प्रा. एकनाथ औटी, कवयित्री डॉ. संगीता फासाटे-कटारे आदींसह मेजर नंदकुमार सैंदाणे, श्रीराम अ‍ॅबॅकस संचालिका प्रा. सौ. पल्लवी सैंदाणे, डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालयाचे संजय बुरकुले, सौ. सुरेखा बुरकुले, पी.एच.डी. प्राप्तीबद्दल डॉ. संगीता फासाटे या सर्वांचा सत्कार करण्यात आला. या सर्व मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

ह.भ.प. भागवतराव मुठे पाटील यांनी श्रीनगरला साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या नियोजनाखाली साहित्य संमेलन घ्यावे, आम्ही सर्व साहित्यिक येऊ, असे आवाहन मेजर सैंदाणे यांना केले असता, असे संमेलन घेऊ असे आश्वासन सैंदाणे यांनी दिले. प्राचार्य टी.ई. शेळके यांनी अध्यक्षीय भाषणातून पीएसआय मेजर सैंदाणे, प्रा. सौ. पल्लवी सैंदाणे, संजय बुरकुले, सुरेखा बुरकुले, डॉ. संगीता फासाटे यांचा गौरव करून अशी व्यक्तिमत्त्वे श्रीरामपूरचा नावलौकिक वाढवितात, असे सांगून सुकळे सरांचे हे गुणग्राहक म्हणून कौतुक केले.

देशभक्ती, समाजसेवा करताना भीती नको भक्ती हवी : सैंदाणे

सन्मानचिन्ह, शाल, बुके, पुस्तके, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार केल्याबद्दल पीएसआय मेजर नंदकुमार सैंदाणे यांनी सुखदेव सुकळे, प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, विविध संस्था आणि व्यक्तींनी केलेला हा सन्मान मला सदैव राष्ट्रसेवा करण्यासाठी बळ देणारा ठरेल, अशी कृतज्ञता व्यक्त केली. देशभक्ती, समाजसेवा करताना भीती नको, भक्ती हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या सेवा वाटेवर स्व. वडील संतराम त्र्यंबक सैंदाणे, आई चंद्रकला सैंदाणे, बंधू रवींद्र सैंदाणे, पत्नी प्रा. सौ. पल्लवी सैंदाणे, सासरे डॉ. बाबुराव उपाध्ये, मेहुणे कचरू जोर्वेकर, गणेशानंद उपाध्ये, नितीन जोर्वेकर, भगिनी, मामी, सर्व कुटुंबीय तसेच मांजरी ग्रामस्थ व मित्रपरिवाराचे आशीर्वाद, प्रोत्साहन, त्यांनी केलेले सत्कार आणि अंतरंगाची देशप्रीती हीच माझी भक्तीसाधना प्रेरक असल्याचे सांगून मेजर सैंदाणे यांनी आपले आर्मीतील अनुभव सांगितले.

COMMENTS