Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिंगार पोलिसांकडून दहा गोवंशीय जनावरांची सुटका

अहमदनगर/प्रतिनिधी - पत्र्याच्या शेडमधील तारेच्या कंपाऊंड मध्ये निर्दयतेने काही गोवंशीय जनावरांना शेडचे लोखंडी पोलला  आखडून बांधून त्यांना चारापाण

शालेय विद्यार्थ्यांचे बालशौर्य पुरस्कार देऊन सन्मान l LokNews24
गोधेगाव सोसायटिच्या चेअरमनपदी बाबासाहेब शेळके तर व्हा. चेअरमनपदी बबन औटे.  
मठमंदिर समिती तर्फे (तर्पण) सामुदायिक श्राध्द विधीची विनामुल्य व्यवस्था

अहमदनगर/प्रतिनिधी – पत्र्याच्या शेडमधील तारेच्या कंपाऊंड मध्ये निर्दयतेने काही गोवंशीय जनावरांना शेडचे लोखंडी पोलला  आखडून बांधून त्यांना चारापाण्याची व्यवस्था न करता क्रूरतेने बांधून ठेवलेल्या ठिकाणी छापा टाकून भिंगार कॅम्प पोलीसानी दहा गोवंशीय जनावरांची सुटका केली. हि कारवाई भिंगार येथील सदर बाजार येथे केली.
या बाबतची माहितीअशी कि भिंगार पोलिसांना माहीती मिळाली की, सदरबाजार, भिंगार येथे पोस्ट ऑफीसच्या पाठीमागे पत्र्याचे शेडमध्ये तारेचे कंपाऊंड मध्ये काही गोवंशीय जनावरांना शेडचे लोखंडी पोलला आखडून बांधून त्यांना चारापाण्याची व्यवस्ता न करता करतेने बांधून ठेवलेले आहेत. या ठिकाणी तात्काळ छापा टाकल्यास तो मुददेमालासह मिळुन येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने या  ठिकाणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी मोहम्मद नूर कुरेशी रा.घर नं 37, सदर बाजार, भिंगार) निसार फत्तेमोहम्मद शेख (रा. घर नं 70, सदर बाजार, भिंगार अहमदनगर ) असे मिळून आले पोलिसांची चाहूल लागताच एक इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला त्याचे नावाबाबत विचारपुस केली असता त्याचे नाव .अख्तर जोहर अहमद शेख (रा घऱ नं 308, सदर बाजार, भिंगार ता अ.नगर ( फरार ) असे असल्याचे समजले. त्यांचे कब्जामधून एकून 78,हजार रुपये किंमतीचे एकून दहा गोवंशीय जनावरे मिळून आल्याने गोवंशीय जनावरे व मोहंमद कुरेशी व निसार शेख यांना ताब्यात घेतले या प्रकरणी भिंगार पोलिसांनी पोलीस हवालदार रघूनाथ  कुलांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात  महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 1976 चे कलम 5 (-) (1), 9, महाराष्ट्र छळ प्रतिबंधक अधिनयम 1960 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिसांनी केली आहे.

COMMENTS