Homeताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनसंशयिताविरुद्ध ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा

राहाता : शहरातील एका परिसरात १४ वर्षीय मुलीशी गैरवर्तन करून धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पॉक

नांदेड जिल्ह्यात अवैध दारूविक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; 140 गुन्हे दाखल, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त!
रेव्ह पार्ट्या करणार्‍यांवर थेट ’मकोका’ लावासामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची मागणी
शेवगाव पोलिसांची धडक कारवाईअवैध वाळू वाहतूक व गोमांस विक्रीवर छापे ; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Minor's Consent Not Valid In POCSO Cases: Bombay HC

राहाता : शहरातील एका परिसरात १४ वर्षीय मुलीशी गैरवर्तन करून धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो) तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी ६ जून रोजी दुपारी घराजवळ असताना संशयिताने तिला एका खोलीत नेल्याचा आरोप आहे. तेथे तिच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
भीतीपोटी मुलीने ही बाब तत्काळ घरच्यांना सांगितली नव्हती. मात्र दोन दिवसांनी तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीय व परिसरातील महिलांनी राहाता पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
 या प्रकरणी हरिदास अर्जुन गायकवाड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS