पुणे येथील फुगेवाडी भागात घडलेल्या मिथेनॉल मिश्रित हातभट्टी दारू सेवन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, नांदेड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अ

पुणे येथील फुगेवाडी भागात घडलेल्या मिथेनॉल मिश्रित हातभट्टी दारू सेवन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, नांदेड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणार्यांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. जिल्हा हातभट्टीमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, गेल्या काही दिवसांत धडक कारवायांचे सत्र राबवून अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणून सोडले आहेत.
वरिष्ठ पातळीवरून आदेश आणि व्यापक मोहीम राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख (भा.प्र.से.), सह आयुक्त श्री. प्रसाद सुर्वे आणि नांदेड विभागाचे विभागीय उप-आयुक्त डॉ. बी. एच. तडवी यांच्या थेट मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात ही प्रतिबंधात्मक मोहीम आखण्यात आली आहे. नांदेडचे अधीक्षक श्री. एस. एल. कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील कार्यकारी निरीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि भरारी पथकाने ही धडक मोहीम यशस्वीपणे राबवली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 29 मे 2026 पासून अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम, तर 2 जून 2026 पासून ’हातभट्टीमुक्त नांदेड जिल्हा’ मोहीम अधिकृतपणे राबवण्यात येत आहे. 140 गुन्हे दाखल; 10 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेदरम्यान एकूण 140 कारवाया (गुन्हे) नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये 137 वारस गुन्ह्यांचा समावेश असून एकूण 142 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे: हातभट्टी दारू: 1,098 लीटर रसायन (दारू तयार करण्याचे कच्चे साहित्य): 13,120 लीटर देशी मद्य: 242.26 लीटर विदेशी मद्य: 8.10 लीटर बिअर: 3 लीटर ताडी: 1,746 लीटर जप्त वाहने: 3 वाहने एकूण जप्त मुद्देमालाची किंमत: रु. 10,72,885/- (दहा लाख 72 हजार आठशे पंच्याऐंशी रुपये). सराईत गुन्हेगारांवर कडक पावले; एकाची रवानगी थेट कारागृहात चालू आर्थिक वर्षात वारंवार गुन्हे करणार्या सराईत मद्य तस्करांवर आणि गुन्हेगारांवर केवळ नेहमीची कारवाई न करता, कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी कडक कलमांखाली कारवाई सुरू आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 93 अन्वये एकूण 39 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. यापूर्वी चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र (बॉण्ड) लिहून देणार्या सराईत गुन्हेगारांपैकी 6 जणांनी बंधपत्राच्या अटींचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या 6 गुन्हेगारांवर थेट ’हद्दपारी’ची कारवाई केली जाणार आहे. याशिवाय, घातक सराईत गुन्हेगारांवर थेट ’एमपीडीए’ (चझऊ-) कायद्यांतर्गत प्रस्ताव दाखल करून त्यांची रवानगी थेट कारागृहात करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. याचाच एक भाग म्हणून, 5 जून 2026 रोजी नांदेडच्या माननीय जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार एका सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याची थेट कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. विभागाचे ब्रीदवाक्य आणि अधिकारी पथक संवर्धनाय राजकोषाय प्रतिपालनाय (राजकोषाचे संवर्धन आणि जनतेचे प्रतिपालन) या विभागाच्या अधिकृत ब्रीदवाक्याप्रमाणे काम करत, शासनाचा महसूल वाढवणे आणि अवैध कृत्यांना आळा घालणे यासाठी हे पथक कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. ही यशस्वी कामगिरी अधीक्षक एस. एल. कदम यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली निरीक्षक सर्वश्री जावेद कुरेशी, आशिष महिंद्रकर, लक्ष्मण पाटील, सरकाळे, तसेच कार्यकारी दुय्यम निरीक्षक सचिन शेट्टे, अमित वालेकर, रामप्रसाद पवार, अमित आढळकर, सुमेध चव्हाण, संदीप देशमुख, श्रीमंत बोरुडे, अमोल शिंदे, रेणुका सलगर, मोनिका पाटील, भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक रमेश राठोड, एकनाथ फडणीस आणि सर्व सहाय्यक दुय्यम निरीक्षक, जवान व जवान-नि-वाहन चालक यांनी बजावली. नागरिकांना प्रशासनाचे आवाहन; टोल फ्री क्रमांक जाहीर नांदेडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही अवैध मद्य खरेदी करू नये. तसेच जिल्ह्यात कुठेही अवैध मद्य, बनावट मद्य किंवा परराज्यातील विदेशी मद्य कोणी बाळगत असेल अथवा विक्री करत असेल, तर त्याची माहिती तात्काळ विभागाला द्यावी. माहिती देणार्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

COMMENTS