Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहता बंदला मिळाला संमिश्र प्रतिसाद

राहाता /प्रतिनिधीः जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजावर अमानुष लाठीहल्ला झाल्याने महाराष्ट्रा राज्यामध्ये विविध शहरांमधून, गावांमध

श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
अकोले शहरात विविध उपक्रमांनी श्रीराम नवमी उत्साहात साजरी
मनसे विद्यार्थी सेनेच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी ओम खेडकर यांची नियुक्ती; शासकीय विश्रामगृहात उत्साहात बैठक

राहाता /प्रतिनिधीः जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजावर अमानुष लाठीहल्ला झाल्याने महाराष्ट्रा राज्यामध्ये विविध शहरांमधून, गावांमध्ये या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी राहाता तालुक्यातही बंदची हाक देण्यात आली होती. राहता बंदला यावेळी समिश्र प्रतिसाद मिळाला.
राहाता शहरात सकाळ पासून काही दुकाने बंद तर काही चालू ठेवण्यात आली होती. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा बंद पुकारून निषेध करण्यात आला आहे. या बंदची हाक सकल मराठा समाज राहाता तालुक्याच्या वतीने  रविवार दि 3 सप्टेंबर 2023 रोजी देण्यात आली होती. आजपर्यंत मराठा समाजाला साथ देणार्‍या सर्व जातीधर्म समाजातील व्यापारी बांधवांनी आपले व्यवसाय दुकाने बंद ठेवून राहाता बंद साठी सहकार्य करावे. असे आवाहन सकल मराठा समाज राहाता यांच्या वतीने करण्यात आले. तर दुसरीकडे राहाता येथील स्वाभिमानी व्यापारी असोसिएशनच्या वतीने म्हटले आहे की, मराठा मोर्चाला आमचा पाठिंबा आहे. जालना जिल्ह्यात जी घटना घडली व मराठी बांधवांवर जो हल्ला झाला. त्याचा आम्ही निषेध नोंदवतो. पण राहत्यामध्ये काही नागरिक राजकारण करत असेल. तर त्याचाही आम्ही तीव्र विरोध नोंदवतो,राहाता शहर हे बंद राहणार नाही. असे स्वाभिमानी व्यापारी असोसिएशनच्या वतीने म्हटले आहे.

COMMENTS