Homeताज्या बातम्याविदेश

पाकिस्तानात प्रथमच हिंदू महिला निवडणुकीच्या रिंगणात

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्लीची निवडणूक होत असून, या निवडणुकीत प्रथमच एक हिंदू महिला निवडणूक लढवत आहे. सवेरा प्रकाश असे या महिलेचे न

कोपरगाव शहरात नालेसफाई मोहिमेस प्रारंभ
निमलष्करी दलाच्या कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करा
ईशा सिंहने भारताला मिळवून दिले सुवर्ण पदक; मनु भाकरच्या खात्यात कांस्य, २५ मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये भारतीय नेमबाजांची कमाल

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्लीची निवडणूक होत असून, या निवडणुकीत प्रथमच एक हिंदू महिला निवडणूक लढवत आहे. सवेरा प्रकाश असे या महिलेचे नाव आहे. या महिलेचे वडील ओमप्रकाश हे डॉक्टर आहेत. यासोबतच प्रकाश यांचे वडील 35 वर्षांपासून पीपीपीचे सक्रिय सदस्य आहेत.पाकिस्तानात 16 व्या नॅशनल असेंब्लीची निवडणूक नवीन वर्षात 8 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडणार आहेत. या महिलेने बुनेर जिल्ह्यातील जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

COMMENTS