पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री गणेश सार्वजनिक वाचनालय येथे संकल्प सेवाभावी संस्था आणि श्री गणेश सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त

पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री गणेश सार्वजनिक वाचनालय येथे संकल्प सेवाभावी संस्था आणि श्री गणेश सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी पंचायत समिती सदस्य राजेश गवळी व माजी सरपंच भारत जवळकर यांच्या हस्ते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच भारत जवळकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेश गवळी, नंदू बीटे, सोनाजी ठोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्व. मुंडे यांच्या राजकीय, सामाजिक आणि जनसामान्यांच्या कल्याणासाठी असलेल्या अथांग कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला आणि त्यांचा विचारांचा वारसा पुढे जपण्याचे आवाहन केले. या प्रसंगी पत्रकार बळीराम मेहत्रे, मच्छिंद्र साठे, अंकुश तागड, अमोल ठोकरे, श्रीकांत ठोकरे यांच्यासह परिसरातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

COMMENTS