Homeताज्या बातम्या

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जनगणना प्रगणकाला दिली स्वतःची माहिती; सक्रिय सहभागातून नागरिकांना दिला सहकार्याचा संदेश

बीड : बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बुधवारी आपल्या शासकीय निवासस्थानी आलेल्या जनगणना प्रगणकाला स्वतःची तसेच कुटुंबाची संपूर्ण माहिती देत

जनगणनेसाठी आता घरोघरी प्रगणक येणार16 मे ते 14 जून दरम्यान घरभेटीद्वारे माहिती संकलनअचूक माहिती द्या, प्रशासनाला सहकार्य करा : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
नागरिकांनी जनगणना स्वतः करून घ्यावी-ब्राईट सोशल फाउंडेशनचे आवाहन
मी सहभागी झाले, आपणही जनगणनेत सहभागी व्हानगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांचे आवाहन

बीड : बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बुधवारी आपल्या शासकीय निवासस्थानी आलेल्या जनगणना प्रगणकाला स्वतःची तसेच कुटुंबाची संपूर्ण माहिती देत जनगणना नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. जिल्हाधिकार्‍यांच्या या कृतीमुळे बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या जनगणना मोहिमेला अधिक गती मिळाली असून नागरिकांनाही या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जनगणनेचे देश आणि राज्याच्या सर्वांगीण विकासातील महत्त्व अधोरेखित केले. शासकीय योजनांचे अचूक नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि भविष्यातील विकास आराखडा तयार करण्यासाठी जनगणना हा अत्यंत महत्त्वाचा आधार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसंख्या, शिक्षण, रोजगार, निवास व्यवस्था, आरोग्य आणि सामाजिक-आर्थिक परिस्थिती यासंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती जनगणनेतून उपलब्ध होत असल्याने प्रत्येक नागरिकाची नोंद होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकार्‍यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, जनगणना प्रगणक आपल्या घरी आल्यानंतर कोणतीही भीती किंवा संकोच न बाळगता त्यांना अचूक, खरी आणि संपूर्ण माहिती द्यावी. नागरिकांच्या सकारात्मक सहकार्यामुळेच ही राष्ट्रीय मोहीम यशस्वी होणार असून विकासाच्या प्रक्रियेला अधिक बळ मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जनगणना मोहिमेशी संबंधित प्रगणक तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS