अंबाजोगाई : दिव्यांगत्वावर मात करत समाजात सक्षमपणे कार्यरत असलेले वैद्यनाथ बँकेचे व्यवस्थापक अभिजित सुगावकर यांना रोटरी 'सक्षम' तर प्रयोगशील शेतक

अंबाजोगाई : दिव्यांगत्वावर मात करत समाजात सक्षमपणे कार्यरत असलेले वैद्यनाथ बँकेचे व्यवस्थापक अभिजित सुगावकर यांना रोटरी ‘सक्षम’ तर प्रयोगशील शेतकरी निवृत्ती तोडकर यांना रोटरी ‘आत्मनिर्भर’ पुरस्काराने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने ‘आई फंक्शन हॉल’ येथे व्यावसायिक सेवा पुरस्कार (Vocational Service Award) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रोटरीचे प्रांतपाल सुधीर लातुरे, उपप्रांतपाल प्रवीण देशपांडे, रोटरीच्या अध्यक्षा रोहिणी पाठक, सचिव मंजुषा जोशी आणि संगीता लातुरे उपस्थित होते. यांच्या हस्ते सुगावकर व तोडकर यांचा गौरव करण्यात आला.
अभिजीत सुगावकर हे दिव्यांगत्वावर मात करून गेल्या २५ वर्षांपासून वैद्यनाथ बँकेत ग्राहकांना अविरत सेवा देत आहेत. तर निवृत्ती तोडकर यांनी आपल्या शेतीत आधुनिक गायगोठा, दूध उत्पादन आणि पशुखाद्य असे विविध पूरक प्रकल्प ग्रामीण भागात यशस्वीपणे सुरू करून आत्मनिर्भर शेतीचा एक प्रेरणादायी आदर्श समोर ठेवला आहे, असे गौरवोद्गार सुधीर लातुरे यांनी आपल्या भाषणात काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिणी पाठक यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. प्रिया नागरगोजे यांनी तर आभार प्रदर्शन वसुधा गडसिंग यांनी केले. या सोहळ्याला परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS