Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. डॉ. श्रीकांत शिंदेंसह महाराष्ट्रातील पाच जणांना ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर

मुंबई : संसदेतील प्रभावी कामगिरी, चर्चांमधील सक्रिय सहभाग आणि लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना दिला जाणारा प्रतिष्

बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेगभाजपकडून कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची निरीक्षकपदी नियुक्ती
ऑपरेशन लोटस की केजरीवालांची मनमानी?
पंजाब वाचवण्याचे आपसमोर आव्हान ?
Maharashtra Mps Selected For Sansad Ratna Award 2026 - महाराष्ट्र के 5  सांसदों को मिला संसद रत्न पुरस्कार 2026, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दी  बधाई| Navbharat Live

मुंबई : संसदेतील प्रभावी कामगिरी, चर्चांमधील सक्रिय सहभाग आणि लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना दिला जाणारा प्रतिष्ठेचा “संसद रत्न” पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल पाच खासदारांची निवड झाल्याने राज्याच्या संसदीय कामगिरीची देशपातळीवर दखल घेतली गेली आहे. देशभरातून निवड झालेल्या १२ खासदारांपैकी पाच खासदार महाराष्ट्रातील असल्याने राज्यासाठी हा विशेष अभिमानाचा क्षण मानला जात आहे.

यावर्षी लोकसभेतील चार आणि राज्यसभेतील एका खासदाराचा या पुरस्कारात समावेश करण्यात आला आहे. वैयक्तिक श्रेणीत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची निवड झाली असून, ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा, जळगावच्या खासदार स्मिता वाघ तसेच राज्यसभेतील पुण्याच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनाही “संसद रत्न” पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये दोन महिला खासदारांचा समावेश असल्याने महिलांच्या संसदीय योगदानाचाही गौरव झाला आहे.

उत्तर प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि गुजरातच्या खासदारांचाही समावेश महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेशातील जगदंबिका पाल आणि प्रवीण पटेल, राजस्थानमधील पी. पी. चौधरी आणि लुंबाराम चौधरी, झारखंडमधील निशिकांत दुबे आणि विद्युत वरण महतो तसेच गुजरातचे नरहरी अमीन यांचा पुरस्कारप्राप्त खासदारांमध्ये समावेश आहे.

चार स्थायी समित्यांचाही होणार गौरव खासदारांसह संसदेतील विविध स्थायी समित्यांच्या उल्लेखनीय कार्याचाही गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये कृषी समिती, वित्त समिती, ग्रामीण विकास व पंचायती राज समिती तसेच कोळसा आणि खाण समिती या चार समित्यांना विशेष सन्मान जाहीर झाला आहे.

COMMENTS