Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड – सोलापूर रेल्वे मार्गाचा केंद्र सरकारने विचार करावा

प्रत्येक जिल्ह्यात होलमार्क सेंटर उघडावेत व्यापार्‍यांची भाजपा निरीक्षक खा. रावत व गोटीया यांच्याकडे मागणी

बीड प्रतिनिधी - सरकारने सोन्यावर होलमार्क आयडी कायदा आणला आहे. तो मध्यमवर्गीय सराफांना घातक आहे. शहारासह  ग्रामीण भागात सराफा सुवर्णकारांनी होलम

शासकीय अधिकार्‍यांनी सामाजिक भावनेने काम करावे
उद्योग विभागाची ‘विशेष अभय योजना’ बंद
कोल्हापूर-भुईबावडा घाटात ट्रक पलटी, मार्गावरील वाहतूक ठप्प

बीड प्रतिनिधी – सरकारने सोन्यावर होलमार्क आयडी कायदा आणला आहे. तो मध्यमवर्गीय सराफांना घातक आहे. शहारासह  ग्रामीण भागात सराफा सुवर्णकारांनी होलमार्क दागिने उबलब्ध केले आहे. परंतु एच यु आय डी करण्यासाठी बाहेर जिल्ह्यात जावे लागते व रस्त्यामध्ये धोका ही होऊ शकतो ही फार मोठी अडचण लक्षात घेऊन, खरेदी- विक्रीच्या सुलभ व्यवहारासाठी सरकारने प्रत्येक जिह्यात होलमार्क सेंटर उघडावेत तसेच 100,200,300,500,टन ऊस कृषींग करणार्‍या युनिटला इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा,ॠडढ कायद्यातील व्यापाऱयाकरिता जी जाचक नियम आहेत त्याविषयी निवेदन दिले गेले जसे की : . सध्या ॠडढ कायद्यामध्ये जर तुम्ही खरेदी केलेल्या मालावरील टॅक्स ची सूट तुम्ही जर विशिष्ट मुदतीपर्यंत घेतली नाही तर ती तुम्हास कधीही मिळणार नाही , म्हणजेच खरेदी ची पूर्ण रक्कम ॠडढ सहित देऊन देखील त्यावर निर्बंध लावण्यात आले आहे. 2. ॠडढ कायद्यात व्यापार्‍याच्या ॠडढ िेीींरश्र वर जर एखादी नोटीस दिली व त्याची सूचना व्यापार्‍यास ई-मेल किंवा डचड द्वारे न दिल्याशिवाय देखील सदर नोटीस कायद्याने वैध समजण्यात येईल याविषयी च्या जाचक नियमावर देखील चर्चा करण्यात आली. तसेच सुरुवातीच्या काळातील व्याज, थोड्या चुका साठी दंड इत्यादी विषयावर निवेदन देण्यात आले.व जळगाव – बीड –  सोलापूर रेल्वे मार्गाचाही केंद्र सरकारने विचार करावा. अशी मागणी काल अखिल भारतीय सराफा सुवर्णकार संघटनेच्या वतीने मोदी 9 महाजनसंपर्क अभियान अंतर्गत  संपर्क से समर्थन कार्यक्रमा अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय निरीक्षक, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री, खा.तिरथसिंहजी रावत व मध्य प्रदेश टुरिझम कार्पोरेशन चेअरमन विनोदजी गोठिया, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा निवडणूक प्रमुख राजेंद्र मस्के, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी उपाध्यक्ष सत्यनारायणाची लाहोटी, अखिल भारतीय सराफा सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष तथा बीड शहर व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष मंगेश लोळगे, जिल्हा संघटक सरचिटणीस प्रा. देविदास नागरगोजे,  यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सराफा सुवर्णकार व व्यापार्‍यांची बैठक संपन्न झाली.  या बैठकि दरम्यान बीड शहर व्यापारी संघ, बीड सराफ सुवर्णकार असोसिएशन व सी ए. प्रॅक्टिसनर असोसिएशन, सीड्स असोसिएशन व विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांची  विविध प्रश्नांवर चर्चा करून समस्या जाणून घेतल्या, मोदी सरकार व त्यांच्या कार्याविषयी  व्यापारी वर्गातील भावना यावेळी जाणून घेतल्या. आमच्या भावना वरिष्ठांपर्यंत मांडाव्यात अशी सूचना यावेळी व्यापारी संघटनांनी केली. बीड मधील व्यापार्‍यांच्या समस्या आणि भावना भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यापर्यंत पोहचवण्याचे काम करू असे खा. रावत आणि गोटीया यांनी व्यापार्यांना आश्वासित केले.  यावेळी शांतिनाथ डोरले, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे मा. उपाध्यक्ष सत्यनारायणजी लाहोटी, राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया ऍग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन मनमोहन कलंत्री,बीड शहर अध्यक्ष प्रकाश कानगावकर,सुदाम चव्हाण, सुरज लाहोटी, साखर कारखान्याचे चेअरमन साईनाथ परभने,उ- गोपाल मालू, उपाध्यक्ष, व गोपाल लड्डा  सचिव बीड जिल्हा उ- व टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन. बीड सराफा सुवर्णकार संघटनेचे उदय बागडे, सत्यनारायण कासट सल्लागार ऑल इंडिया ऍग्रो, लॉजिंग अँड बोर्डिंग चे अध्यक्ष विश्वंभर थिगळे, जगदीश गुरूखुदे, शरद दुग्गड, बद्रीनारायण जटाळ, साहिल लोळगे,  मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सची उपाध्यक्ष वाय जनार्दन राव, बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष भास्कर जाधव बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष अशोक शेटे, रेल्वे कृती समितीचे जवाहर सारडा, बीड शहर व्यापारी महासंघटनेचे सचिव राजेंद्र बनसोडे, हेरकरसर, अभय कोटेचा राम मोटवाणी, शांतीलाल पटेल आदि व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते!  प्रास्ताविक शहर संघटनेचे सचिव सूर्यकांत महाजन यांनी केले.

COMMENTS