Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना अधिकार न देणे हा राज्यघटनेचा अपमान – आमदार थोरात

संगमनेर /प्रतिनिधी ः राष्ट्रपती पद हे देशाचे सर्वोच्च पद असून  नवी दिल्ली येथे बांधलेल्या नवीन सेंट्रल व्हिस्टा या संसद इमारतीचे उद्घाटनासाठी राष

शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार ? l Lok News24
गोरक्षनाथ गडावर ७ जूनला जलउत्सव व दररोजच्या महाप्रसादाचा प्रारंभ
मालिकांच्या राजीनाम्यासाठी अहमदनगरमध्ये भाजपचे आंदोलन | LOKNews24

संगमनेर /प्रतिनिधी ः राष्ट्रपती पद हे देशाचे सर्वोच्च पद असून  नवी दिल्ली येथे बांधलेल्या नवीन सेंट्रल व्हिस्टा या संसद इमारतीचे उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना अधिकार न देणे हा राज्यघटनेचा अपमान असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे
संगमनेर येथे माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की, जगातील सर्वात मोठी आणि समृद्ध लोकशाही असलेल्या भारतात राष्ट्रपती पद हे देशाचे सर्वोच्च पद आहे. या पदावर महामहीम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्म या आदिवासी समाजातील आहेत. उद्घाटनाचा अधिकार हा राष्ट्रपती महोदयांचाच आहे. मात्र असे होताना दिसत नाही हे संपूर्ण देशाला वाईट वाटणारे आहे.
आदिवासी, मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना संधी न देणे हा राज्यघटनेचा अपमान आहे. समृद्ध लोकशाही असलेल्या या देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने नवीन संसद भवनाच्या उद्घाटन केले पाहिजे. ही सर्वसामान्य देशवासियांची रास्त भावना आहे .मात्र असे होताना दिसत नाही याचे संपूर्ण देशाला वाईट वाटत असल्याचे ही काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

COMMENTS