Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

नांदेड जिल्ह्यासाठी 20 मे रोजी येलो अलर्ट

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी नांदेड जिल्ह्यासाठी 20 मे 2026 रोजी येलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी उष्मालाट होण्याची

उष्णतेचा कहर : 43 अंशांपार तापमानाने नांदेडकर हैराण; दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट
अहिल्यानगर  जिल्ह्यात 99 टक्के पाऊस
कर्जत तालुक्यात वादळी पावसाचा तडाखापिकांसह घरांचे मोठे नुकसान; एक गाय दगावली



प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी नांदेड जिल्ह्यासाठी 20 मे 2026 रोजी येलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी उष्मालाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, ओआरएस, ताक, लिंबूपाणी यांसारखे द्रवपदार्थ घेणे, हलके सुती कपडे वापरणे तसेच बाहेर पडताना डोके झाकणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. दुपारी 12 ते 3 दरम्यान उन्हात जाणे टाळावे, चहा, कॉफी, शीतपेये व तेलकट अन्न टाळावे, तसेच वाहनात लहान मुले किंवा प्राणी सोडू नयेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS