पाथरी-सेलू महामार्ग बनला अडथळ्यांची शर्यत; दर दिवशी होतायत अपघात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथरी-सेलू महामार्ग बनला अडथळ्यांची शर्यत; दर दिवशी होतायत अपघात

पाथरी:-शहरातुन सेलू कडे जाणा-या महामार्गाची अवस्था अतिषय दयनिय झाली असून हा रस्ता आहे की तळे हेच कळायला मार्ग नाही दर दिवशी लहान मोठे अपघात होत असून

वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाचा मुंबईला जोरदार तडाखा
मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे सुवर्ण पदकाने सुजित देशमुख सन्मानीत
विठ्ठलराव वाडगे यांना सरपंच सेवा संघाचा पुरस्कार प्रदान

पाथरी:-शहरातुन सेलू कडे जाणा-या महामार्गाची अवस्था अतिषय दयनिय झाली असून हा रस्ता आहे की तळे हेच कळायला मार्ग नाही दर दिवशी लहान मोठे अपघात होत असून प्रवाशांना अडथळ्यांची शर्यत खेळत प्रवासाचा अनुभव येत आहे.सेलू-पाथरी महामार्गार होणार आहे मागिल काही वर्षा पासून या रस्त्या वरुन जातांना जिव मुठीत धरुनच वाहन धारकांना प्रवास करावा लागत आहे.

पाथरी ते सिमुरगव्हाण पर्यंत या महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडल्याने त्याला तळ्याचे स्वरुप आले आहे. या मुळे वाहन चावत असतांना वाहन चालकाला पाण्या मुळे खड्याच्या खोलीचा अंदाज येत नाही परिणामी वेगातील वाहनाचा अपघात होऊन जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी सकाळी सहा वाजता बीड जिल्ह्यातील खांडेपारगाव येथील शेतकरी विश्‍वंभर बाजीराव सपकाळ हे त्यांच्या 79 क्विंटल कापुस घेऊन आयशर क्र एमएच 04 सीयू 8759 मधून सेलू कडे जात होते हा आयशर बोरगाव नजिक खेडूळा पाटीपासू जवळच चालकाला खड्याचा अंदान न आल्याने पलटी झाला सकाळी सहाला ही घटना घडली तेंव्हा पासून शेतकरी पुढील पर्यायी व्यवस्थेची वाट पहात येथे बसून होता. या अपघातात आयशरचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गाचे काम होईल तेव्हा होईल पण किमाण महामार्ग प्राधिकरणाने खड्डे भरून या महामार्गाची डागडूजी तरी करावी अशी भावना पाथरी,सेलूकरांची आहे.

COMMENTS