Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दीपाली सय्यद यांची माजी स्वीय सहायकाविरोधात पोलिसात तक्रार

मुंबई/प्रतिनिधी ःअभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर काही दिवसांपासून त्यांचे माजी स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदे यांनी बेछुट आरोप करत राळ उडवून दिली हो

कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या गाड्यांना पुन्हा फासले काळे !
संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारली
 सारा अली खान वर आली चेहरा लपवण्याची वेळ

मुंबई/प्रतिनिधी ःअभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर काही दिवसांपासून त्यांचे माजी स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदे यांनी बेछुट आरोप करत राळ उडवून दिली होती. अखेर याप्रकरणी सय्यद यांनी मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बेछूट आरोप करुन भाऊसाहेब शिंदे यांनी आपली बदनामी केली, असा आरोप सय्यद यांनी केला आहे. या तक्रारीची दखल घेत ओशिवरा पोलिसांनी भाऊसाहेब शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. सय्यद यांची दुबई, लंडनमध्ये मालमत्ता आहे, असा आरोप यापूर्वी पत्रकार परिषद घेत भाऊसाहेब शिंदे यांनी केला होता. त्यावरुनच दीपाली सय्यद यांनी पोलिसांत धाव घेत बदनामीची तक्रार दिली आहे. भाऊसाहेब शिंदे हे सय्यद यांच्या सेवाभावी संस्थेचे कामकाज 2019 पर्यंत पाहत होते. पण सय्यद यांनी शिंदे यांना 2019 मध्ये कामावरुन काढले होते. त्यानंतर भाऊसाहेब शिंदे यांनी दीपाली सय्यद यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. भाऊसाहेब शिंदे यांनी दीपाली सय्यद यांचे पाकिस्तान आणि दुबई कनेक्शन असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांनी सामूदायिक विवाहाच्या नावाखाली अनेक बोगस लग्न लावल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर भाऊसाहेब शिंदे यांच्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया न देता दीपाली सय्यद यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आता याप्रकरणी ओशिवरा पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर दीपाली सय्यद यांनीही भाष्य केले आहे. दिपाली सय्यद म्हणाल्या, माझ्यावर आणि माझ्या ट्रस्टवर जे आरोप झाले ते अत्यंत चुकीचे आहेत. दुसरीकडे, भाऊसाहेब शिंदे यांनीही दीपाली सय्यद यांच्याकडे कारवाई करावी, अशी मागणी उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.

COMMENTS