Homeताज्या बातम्या

हदगाव पोलीस ठाण्यात परमेश्वर कदम रुजू; कायदा व सुव्यवस्था राखण्याला देणार प्राधान्य

नांदेड : हदगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी परमेश्वर कदम यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे हदगाव शहर आणि तालुक्य

नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहिमेचा धडाका
विनापरवाना दारू विक्रीप्रकरणी पोलिसांची कारवाई; कुंटूर येथे ‘राजवाडा हॉटेल’वर धाड, गुन्हा दाखल
पिंपळगाव फाट्यावर मटका व जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा धडक छापा; १.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : हदगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी परमेश्वर कदम यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे हदगाव शहर आणि तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

नूतन पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्यासमोर तालुक्यातील अवैध धंदे, वाहतूक कोंडी आणि वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी कारवाई करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. नागरिकांच्या तक्रारींचा तत्परतेने निपटारा करणे, पोलीस-जनता संवाद वाढविणे आणि शिस्तबद्ध प्रशासनावर भर देण्याची अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर, तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाई करण्यास आपले पहिले प्राधान्य असेल, असे कदम यांनी सांगितले.

COMMENTS