९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही… भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळे…

Homeताज्या बातम्यादेश

९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही… भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळे…

प्रतिनिधी : लखनौ आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात अन्य पक्ष अस

मुंबई महापालिकेसाठी भाजपचा ‘मेगा प्लॅन’… सुरु केली नवी रणनीती
भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री
भूपेंद्र पटेलांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ-पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा

प्रतिनिधी : लखनौ

आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात अन्य पक्ष असा सामना रंगण्याची शक्यता आहे. 

तसेच विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी भाजपाने कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता योगी सरकारमधील एका मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाहीत, तर देवाचा अवतार आहेत, असे म्हटले आहे. या वक्तव्याने ते चांगलेच चर्चेत आले आहे.

उत्तरप्रदेशमधील हरदोई येथील एका जनसभेला संबोधित करताना योगी सरकारमधील भाजपा मंत्री उपेंद्र तिवारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. 

“नरेंद्र मोदींचा अभिमान बाळगा, ते नवयुगाचे निर्माते आहेत. असा महापुरुष या धरतीवर एकदाच येतो. नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत.

एका प्रधानसेवकाच्या रूपात आपल्यामध्ये काम करण्यासाठी ते आले आहेत.” असे उपेंद्र तिवारी यांनी म्हटले आहे.

९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही काही दिवसांपूर्वी तिवारी यांनी इंधन दरवाढीवरून वादग्रस्त वक्तव्य केले होते.

या वक्तव्यावरून जोरदार टीकादेखील करण्यात आली होती. “भारतामध्ये चारचाकी गाड्या चालवणाऱ्या मोजक्या लोकांना पेट्रोलची गरज असते. ९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही.” असे वादग्रस्त वक्तव्य उपेंद्र तिवारी यांनी केले.

त्याचबरोबर, त्यांनी  कोरोना लसीवरून युक्तिवाद केला होता. “सरकारने कोरोनाच्या लसी आणि कोरोनावरील उपचार मोफत पुरवले आहेत. इंधनाचे दर वाढलेले नाहीत. तुम्ही जर दरडोई उत्पन्न आणि इंधनाच्या दरांमध्ये झालेली वाढ याची तुलना केली, तर इंधनाचे दर फार कमी आहेत.” असे तिवारी यांनी यापूर्वी म्हटले होते.

COMMENTS