पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत सायकल वापर वाढविण्याचे आवाहन केले आहे. त्यां

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत सायकल वापर वाढविण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी संदेशाला प्रतिसाद देत अंबाजोगाई येथील दिनदयाळ बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) महेश उत्तमराव शेळके यांनी आपल्या दैनंदिन कामासाठी सायकलचा वापर करत बँकेत उपस्थिती लावली.
महेश शेळके यांनी सायकलचा वापर करून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. वाढते प्रदूषण, इंधनाच्या वाढत्या किंमती आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने शक्य तितक्या प्रमाणात सायकलचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सायकल ही केवळ प्रवासाचे साधन नसून आरोग्य जपण्यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी प्रभावी माध्यम आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या उपक्रमाचे बँकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करत इतरांनीही पर्यावरण रक्षणासाठी अशाच प्रकारे पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या संदेशाला प्रतिसाद देत समाजातील विविध स्तरांतील नागरिक पुढे येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महेश शेळके यांच्या या उपक्रमामुळे अंबाजोगाई शहरात सकारात्मक संदेश गेला असून युवकांमध्येही सायकल वापराबाबत जागृती निर्माण होत आहे.पर्यावरण रक्षण, आरोग्य संवर्धन आणि इंधन बचतीसाठी सायकल संस्कृती रुजविणे ही काळाची गरज असून समाजाने यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

COMMENTS