Homeताज्या बातम्याबीड

गाईला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या; निरुपयोगी जनावरांबाबत स्पष्ट भूमिका घ्यासर्व धर्मीय नागरिक एकवटले; जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर

देशी गाईला ‘राष्ट्रीय पशू’चा दर्जा देण्यात यावा तसेच कमी उत्पादनक्षम जनावरांच्या संदर्भात स्पष्ट व व्यवहार्य धोरण ठरविण्यात यावे, अशी मागणी बीड ज

अवैध वाळू उपसा प्रकरणी गेवराईच्या तहसीलदारांवर कारवाई का नाही?प्रश्न तडीस लावणार-आ.विजयसिंह पंडित
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट-बीड शहरातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी निधीची मागणी-बीड शहर, ग्रामीण भागातील विविध विकासकामांबाबतही निवेदन सादर
दरोडा व बलात्काराच्या गुन्हयात आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी



देशी गाईला ‘राष्ट्रीय पशू’चा दर्जा देण्यात यावा तसेच कमी उत्पादनक्षम जनावरांच्या संदर्भात स्पष्ट व व्यवहार्य धोरण ठरविण्यात यावे, अशी मागणी बीड जिल्ह्यातील सर्व धर्मीय नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आले असून, जिल्हाधिकारी,बीड यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भारत देश हा विविध संस्कृती आणि परंपरांचा संगम असून गाईला विशेष धार्मिक, सामाजिक व आर्थिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात गाईला ‘गोमाता’ म्हणून पूजनीय स्थान आहे. याशिवाय शेती व्यवस्थेतही गाईचे मोठे योगदान असून, शेणखत व गोमूत्र सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त ठरते. दुग्धउत्पादनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. देशी गाईंची संख्या घटत चालल्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. देशी गाईला ‘राष्ट्रीय पशू’चा दर्जा दिल्यास संवर्धनासाठी प्रभावी धोरणे राबविता येतील आणि जनजागृतीही वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान,जर्सी व इतर मिश्रित जातींच्या जनावरांची उत्पादकता कमी झाल्यानंतर त्यांचे पालन करणे पशुपालकांसाठी आर्थिकदृष्ट्या कठीण ठरत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अशा निरुपयोगी किंवा कमी उत्पादनक्षम जनावरांच्या बाबतीत, विद्यमान कायद्यांच्या चौकटीत राहून आणि पशूकल्याणाचे नियम पाळून, त्यांच्या कायदेशीर कत्तलीस परवानगी देण्यासाठी स्पष्ट धोरण आखावे, अशी मागणी शहरातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी एकत्र येऊन निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.तसेच पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनाही प्रत पाठविण्यात आली आहे. यावेळी पत्रकार पठाण अमरजान,बीड बचाव मंचाचे नितीन जयभाय,शेख नदीम,पत्रकार मुस्तफा पठाण,शेख पाशाभाई,अशोक (मायकल) वडमारे,राम मार्कंडे,शेख सलमान,शेख शकील,फेरोज शेख, शेख रियाज सह इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS