Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीएसएमटीवर प्लॅटफॉर्मचा विस्तार सुरू; कोकणवासीयांचा परतीचा प्रवास त्रासदायक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म विस्तार आणि पुनर्विकासाच्या कामांमुळे मध्य रेल्वेने कोकण मार्गावरील का

पाण्याच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला; लोहगाव शिवारातील घटनेप्रकरणी दोघांवर सोनईत गुन्हा दाखल
प्रशिक्षणादरम्यान पोलीस मुख्यालयात ‘हँडग्रेनेड’चा स्फोट; चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी, प्रकृती स्थिर
उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरवादी समाज आक्रमक; ३० जूनला मुंबईत विधानसभेला घालणार घेराव
Mumbai's CSMT redevelopment: Railways achieve 15% progress on Rs 2,450  crore project | Mumbai News - The Times of India

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म विस्तार आणि पुनर्विकासाच्या कामांमुळे मध्य रेल्वेने कोकण मार्गावरील काही गाड्यांचे अंशतः रद्दीकरण २९ मे पर्यंत वाढवले आहे. काही गाड्या सीएसएमटीऐवजी दादर किंवा ठाणे स्थानकांपर्यंतच धावणार आहेत. त्यामुळे उन्हाळी सुट्टी संपवून कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या कोकणवासीयांचा परतीचा प्रवास अत्यंत त्रासदायक होणार आहे.

कन्फर्म तिकीट न मिळणे, गाड्या विलंबाने धावणे यांमुळे मजल दरमजल करत कोकणवासी गावी पोहोचले होते. आता मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाल्याने कोकणवासी मुंबईतील घराकडे परतत आहेत. मात्र, या प्रवासातही अडचणींचा डोंगर त्यांची पाठ सोडायला तयार नाही. तेजससह मांडवी, कोकणकन्या, जनशताब्दी यांसह अन्य गाड्या तासनतास विलंबाने धावत आहेत.

काही प्रवाशांना रेल्वे स्थानकात उतरून उपनगरात जायचे असल्याने त्यांची अधिकच कोंडी झाली आहे. दक्षिण मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांना मोठ-मोठ्या बॅगांसह लोकलने प्रवास करताना गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अधिक गैरसोय होत आहे. अनेकांना टॅक्सीचा पर्याय स्वीकारावा लागत असल्याने आर्थिक भारही सहन करावा लागत आहे. प्रवासाचा वेळ आणि प्रवास खर्च दोन्ही वाढत आहे. त्यात आता काही गाड्या केवळ दादर आणि ठाण्यापर्यंत धावणार असल्याने कोकणवासीयांची मोठी दमछाक होणार आहे.

COMMENTS