Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

कामठा (बु.) येथील शेतकर्‍यांचा खून

अर्धापूर : तालुक्यातील कामठा बु. येथील शेतकरी घराच्या समोर झोपला असतांना डोक्यात गंभीर मार लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. हि घटना दि.18 मंगळवारी रो

माष्टी येथे शांतता व सामाजिक सलोखा बैठक संपन्न
मालेगावात जियो नेटवर्कची गंभीर समस्या; ग्राहक त्रस्त
खासदारांचा फोन जाताच गुत्तेदार लाईनवर; रखडलेला रस्ताचे काम सुरू


अर्धापूर : तालुक्यातील कामठा बु. येथील शेतकरी घराच्या समोर झोपला असतांना डोक्यात गंभीर मार लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. हि घटना दि.18 मंगळवारी रोजी मध्यरात्री 2-30 ते 5 च्या दरम्यान घडली असल्याचा संशय आहे.
कामठा येथील शेतकरी प्रल्हाद राजाराम कल्याणकर (वय 56) यांच्या कानाच्या वर डोक्याला जबर वार करून गंभीर जखमी झालेल्या शेतकरी जागीच ठार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षका अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्‍वर व्यंजन यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक चंद्रकांत कदम यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जमादार ताटे, पप्पू चव्हाण, रणवीरकर, आर.एस. नरवाडे,संभाजी शिवभक्त, सुभाष मुंगळ, बाबाराव चाटे, संतोष काळे,इंदुताई गवळी या खुन प्रकरणी सखोल चौकशी करीत आहेत.या खुन प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

COMMENTS