Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

मालेगावात जियो नेटवर्कची गंभीर समस्या; ग्राहक त्रस्त

अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे जियो मोबाईल नेटवर्कची सेवा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गा

कुंडलवाडी शहरात दररोज लाखो लिटर पाणी वाया; अनधिकृत वापरावर कारवाईची मागणी
कामठा (बु.) येथील शेतकर्‍यांचा खून
खासदारांचा फोन जाताच गुत्तेदार लाईनवर; रखडलेला रस्ताचे काम सुरू


अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे जियो मोबाईल नेटवर्कची सेवा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात उभारण्यात आलेला जियोचा मोबाईल टॉवर केवळ नावालाच असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
मालेगाव हे परिसरातील महत्त्वाचे बाजारपेठेचे केंद्र असून येथे जियो ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून जियोचे नेटवर्क सतत गायब होत असल्याने ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकदा नेटवर्क बंद झाल्यानंतर तासन्तास सेवा पूर्ववत होत नसल्याने नागरिकांचे संपर्क तुटत आहेत. या समस्येमुळे ऑनलाइन व्यवहार, शासकीय कामकाज, बँकिंग सेवा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक काम तसेच व्यापारी व्यवहारांवर मोठा परिणाम होत आहे. अनेक ग्राहकांनी जियो कंपनीकडे तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.  जियोची सेवा म्हणजे सुविधा नसून अडचण आणि खोळंबा बनली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्राहकांकडून व्यक्त होत आहे. संबंधित कंपनीने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन मालेगावातील नेटवर्क सेवा सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

COMMENTS