Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

नांदेड विधान परिषद स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर18 जून रोजी मतदान; जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू, प्रशासन सज्ज

नांदेड : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून

जिल्हा नियोजन निधीसाठी पालकमंत्र्यांच्या दारात नगरसेवकांची रांग; महापालिकेत प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी संघर्ष तीव्र
दैनिक लोकमंथनची प्रमुख मागणीअधीक्षक अभियंता अविनाश धोंडगेंची पदोन्नती थांबवावीदाखल गुन्हे, प्रलंबित चौकश्या पूर्ण होईपर्यंत साईड पोस्टिंग द्यावीबनावट शिफारसपत्रांच्या आधारे कामे मंजूर प्रकरणात कारवाई व्हावी
25 किलोच्या खारीक-खोबर्‍याच्या हारातून शिक्षणसेवेचा गौरव;प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकरांकडून मधुसूदन देशमुखांचा आगळावेगळा सत्कार


नांदेड : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, जिल्ह्यात तत्काळ आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजकुमार माने यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, निवडणुकीची अधिसूचना 25 मे 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून असून, अर्जांची छाननी 2 जून रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 जून निश्‍चित करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी मतदान 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होणार असून, मतमोजणी 22 जून रोजी करण्यात येणार आहे.
नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघात सध्या 17 कार्यरत स्थानिक प्राधिकारी संस्था असून, मतदारांची संख्या 432 इतकी आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईपर्यंत या संख्येत वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 8 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार असून, प्रत्येक उपविभागीय मुख्यालयातील तहसील कार्यालयात एक मतदान केंद्र राहणार आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजकुमार माने यांनी मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रम 2026 संदर्भात सविस्तर माहिती दिली. मतदार नोंदणी, दुरुस्ती व पडताळणी प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व राजकीय पक्ष, स्थानिक संस्था आणि प्रशासनाला केले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेचा कोणताही भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

COMMENTS