Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदवड तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पाच गावातील पाणी स्रोत वागदर्डी धरणातून उपलब्ध करण्याबाबत जिल्हा परिषदेने केली तांत्रिक समिती गठीत

चांदवड - तालुक्यातील दरेगाव, शिंगवे, डोनगाव, निमोन, वाद वराडी या गावांना सध्या कोट्यवधी रुपयांची जलजीवन योजनेची कामे मंजूर झाली आहेत. मात्र या गा

सादिकच्या मृत्यूचे गूढ आज उकलणार; पोलिस अधीक्षकांकडे आला अहवाल, तपास सीआयडीकडे वर्ग
भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता (Video)
आमिर खान कडे लवकरच वाजणार सनई-चौघडे

चांदवड – तालुक्यातील दरेगाव, शिंगवे, डोनगाव, निमोन, वाद वराडी या गावांना सध्या कोट्यवधी रुपयांची जलजीवन योजनेची कामे मंजूर झाली आहेत. मात्र या गावात पाण्याचा उन्हाळ्यात पुरेल इतका शाश्वत स्रोत उपलब्ध नाही म्हणून मंजूर झालेली कामे या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी ठराव करून ही योजना रद्द करून वागदर्डी धरणात पाणी  आरक्षित करून या गावांना पाणीपुरवठा करावा अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याकडे केली होती. यात निमोणचे सरपंच डॉ. स्वाती भावराव देवरे, दरेगाव सरपंच सरला जालिंदर पवार, शिंगवे सरपंच आत्माराम  खताळ, डोनगाव सरपंच गोकुळ वाघ, वाद वराडी सरपंच प्रविण आहेर यांनी पत्राद्वारे संबंधित नविन योजना राबवण्याची मागणी केली होती. तसेच आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याकडे या संदर्भात जाऊन सतत पाठपुरावा केला होता. आ.आहेर यांनी शासनदरबारी यासाठी सतत पाठपुरावा केला होता.तसेच नाशिक जिल्हा परिषद येथे  आ. आहेर यांनी स्वतंत्र बैठक घेऊन या संदर्भात चर्चा करण्यात आली होती. अखेर  सदर या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली असून सदर योजनेसाठी  सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी तसे पत्र संबंधित विभागाला दिले असून त्यावर त्वरित अहवाल मागितला आहे. त्यामुळे सदर योजना या गावात राबवण्यात उशीर होत असला तरी ही नवीन योजना मंजूर झाली तर या पाच गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. सदर   योजनेच्या अभ्यासासाठी तांत्रिक समिती गठीत करण्यात आली असून जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हे या समितीचे प्रमुख असून सदर समिती सदस्यांमध्ये कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद इवद क्रमांक दोन , उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग चांदवड, उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग निफाड, उपअभियंता  जीएसडीए नाशिक यांचा समावेश आहे.या तांत्रिक समितीने समितीने वागदर्डी धरणातून पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सर्व बाबींचा अभ्यास करून दिनांक 2 सप्टेंबर 2023 पर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे.

COMMENTS