Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

रूपाली चाकणकरांना आता ईडीची नोटीसअशोक खरात प्रकरणात चौकशीला वेग

मुंबई : नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तपासाची व्याप्ती वाढत असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अडचणी

अशोक खरातच्या कोठडीत वाढ, चौदावा गुन्हा दाखल
भोंदू अशोक खरातचा ताबा ईडीकडे
खरात प्रकरणातील महत्वाचा साक्षीदाराचा अपघातात ठारशिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र शेळके व पत्नीचा मृत्यू


मुंबई : नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तपासाची व्याप्ती वाढत असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष तपास पथकाकडून नुकतीच त्यांची सविस्तर चौकशी करण्यात आल्यानंतर आता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने त्यांना मंगबळवारी नोटीस बजावली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, चाकणकर यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले असून, लवकरच त्यांची लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अशोक खरात याच्यावर मोठ्या प्रमाणात खंडणी उकळल्याचे गंभीर आरोप आहेत. तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, या कथित रॅकेटमधून सुमारे सत्तर कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हे आर्थिक व्यवहार लपवण्यासाठी विविध बेनामी बँक खात्यांचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवहारांशी संबंधित काही धागेदोरे रूपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचल्याने तपास यंत्रणांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या व्यवहारांमध्ये त्यांचा थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग होता का, याचा आता सखोल तपास सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी विशेष तपास पथकाने नाशिकमध्ये रूपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी केली होती. चौकशीदरम्यान विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. काही आर्थिक व्यवहार, संस्थांशी संबंधित नोंदी तसेच संपर्कांची माहिती तपास अधिकार्‍यांनी पडताळून पाहिल्याचे सांगितले जात आहे. विशेष तपास पथकाच्या चौकशीनंतर लगेचच सक्तवसुली संचालनालयाने हालचाली सुरू केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. आर्थिक गैरव्यवहार, बेकायदेशीर पैशांचा वापर आणि पैशांच्या गैरमार्गे देवाणघेवाणीच्या शक्यतेवर स्वतंत्र तपास होणार असल्याची चर्चा आहे. तपास यंत्रणांच्या रडारवर ‘शिवनिका’ नावाची संस्थाही आली आहे. या संस्थेमधील रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेची माहिती तपासली जात आहे. अशोक खरातने कथितरीत्या गोळा केलेल्या पैशांचे व्यवहार या संस्थेमार्फत झाले का, तसेच आर्थिक व्यवहार लपवण्यासाठी काही मदत करण्यात आली का, याचा शोध घेतला जात आहे. याशिवाय, या व्यवहारांचे धागेदोरे राज्याबाहेरील इतर भागांपर्यंत पोहोचतात का, याचाही तपास सुरू आहे.
ईडीच्या तपासाकडे राज्याचे लक्ष
राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणात या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात ईडीने थेट या तपासात प्रवेश केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. चौकशीत ठोस पुरावे आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता सक्तवसुली संचालनालयाच्या पुढील पावलांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS