Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक खरातच्या कोठडीत वाढ, चौदावा गुन्हा दाखल

अहिल्यानगर : नाशिक जिल्ह्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासाचा वेग वाढला असून खरातला गुरूवारी तिसर्‍या गुन्ह्यात न्यायालयाने त्य

खरात प्रकरणातील महत्वाचा साक्षीदाराचा अपघातात ठारशिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र शेळके व पत्नीचा मृत्यू
नाशिकमध्ये नामांकित कंपनीत तरूणींचे लैंगिक शोषण; एचआरसह सहा जणांना कोठडी
रूपाली चाकणकरांना आता ईडीची नोटीसअशोक खरात प्रकरणात चौकशीला वेग

अहिल्यानगर : नाशिक जिल्ह्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासाचा वेग वाढला असून खरातला गुरूवारी तिसर्‍या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वीच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. मात्र यासोबतच त्याच्यावर फसवणुकीचा एक गुन्हा दाखल कररण्यात आल्यामुळे एकूण गुन्ह्यांची संख्या 14 झाली आहे.
सुनावणीदरम्यान तपास यंत्रणांनी आरोपीच्या कारवायांचा तपशील मांडला. लोकांना भीती दाखवण्यासाठी नकली साप आणि वन्यप्राण्यांचा वापर, मंतरलेले खडे व इतर वस्तूंच्या नावाखाली फसवणूक, तसेच महिलांना प्रभावाखाली आणण्यासाठी संशयास्पद पदार्थ दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या पदार्थांमध्ये नेमके काय मिसळले होते आणि त्यांचा पुरवठा कुठून होत होता, याचा तपास करण्यासाठी कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. सरकारी बाजूने असा युक्तिवाद करण्यात आला की, आरोपी तपासात सहकार्य करत नसून त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या संचय माध्यमे व संगणकीय साधनांमधील माहितीच्या आधारे समोरासमोर चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच या गुन्ह्यातील इतर सहकार्‍यांचा शोध घेणे बाकी असल्याचेही नमूद करण्यात आले. दुसरीकडे, बचाव पक्षाने कोठडीला विरोध दर्शवत एकाच मुद्द्यावर वारंवार कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद केला. आधीपासूनच विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू असल्याने नवीन कोठडी देणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून खरातविरोधातील गुन्ह्यांची संख्या चौदा झाली आहे. सिन्नर परिसरातील जमीन व्यवहारांमध्ये शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर उभारण्याचे आमिष दाखवून आणि दैवी शक्ती असल्याचा दावा करत शेतजमिनी स्वतःच्या नावावर करून घेण्यात आल्या. या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर मालमत्ता हस्तांतरित झाल्याचे उघड झाले आहे. विरोध करणार्‍यांना जादूटोण्याच्या भीतीने धमकावल्याचेही आरोप आहेत. अत्यल्प मोबदल्यात मोठ्या क्षेत्रफळाची जमीन हस्तगत केल्याची नोंद असून या व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू आहे. काही संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी नोटिसा देण्यात येण्याची शक्यता असून पतसंस्थेतील खात्यांमधील कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रित झाले आहे. संबंधित खात्यांमधील व्यवहारांची छाननी करून पैशांचा स्रोत आणि वापर याचा मागोवा घेतला जाणार आहे.

प्रतिभा चाकणकर यांचीही होणार चौकशी
रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिस नोटीस बजावणार असल्याची माहिती आहे. समता पतसंस्थेतील खात्यांसदर्भात पोलिस त्यांची चौकशी करणार आहे. समता पतंसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांचे देखील चार खाते आहेत. प्रतिभा चाकणकर यांच्या नावे दोन तर त्यांच्या मुलांच्या नावे दोन खाती आहेत. विशेष म्हणजे, या चार खात्यांवर 2 कोटी 40 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती तपास अधिकार्‍यांच्या हाती लागल्याने आता या पैशांसदर्भात आणि आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी होणार आहे.

COMMENTS