कोपरगाव शहर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचे अत्यंत विश्वास शिलेदार म्हणून सबंध राज्यभर सर्वपरिचित असलेले पक्षा

कोपरगाव शहर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचे अत्यंत विश्वास शिलेदार म्हणून सबंध राज्यभर सर्वपरिचित असलेले पक्षाचे प्रदेश प्रवक्ते, अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरु गंगागिरीजी महाराज महाविद्यालय कोपरगाव चे व्यवस्थापन समिती सदस्य अॅड. संदीप वर्पे यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य पदी निवड झाली आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरीब बहुजनांसाठी स्थापन केलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीची मीटिंग नुकतीच सातारा येथे संपन्न झाली असता सन 2026 ते 29 करिता माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांची सर्वानुमते अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली तर कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिकेचा मुलगा नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अॅड. संदीप गोरखनाथ वर्पे यांची आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेच्या सर्वोच्च शिखर समितीच्या मॅनेजिंग कौन्सिलवर सदस्य पदी बिनविरोध निवड करण्यात आल्याने कोपरगावकरांसाठी नक्कीच ही अभिमानास्पद बाब आहे. यावर प्रतिक्रिया देताना अॅड.संदीप वर्पे म्हणाले की, खासदार शरद पवार साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवत आशिया खंडातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेच्या शिखर बॉडीवर अनेक मोठमोठे अभ्यासू मान्यवरांसोबत काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी साहेबांचा नेहमीच आभारी असेल माझ्या पदाचा माध्यमातून मी रयत च्या भल्यासाठी काम करेल असा विश्वास त्यांनी या प्रसंगी दिला.

COMMENTS