कोपरगाव शहर : पक्षाचे काम न करता पदाचा दुरुपयोग करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांची पदे काढून घेण्यात येतील, असा स्पष्ट इशारा राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी दिला. कोपरगाव येथे पोहेगाव नागरी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण’ या तत्त्वावर पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे, असे आवाहन वाघमारे यांनी केले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले असून, सर्वसामान्य महिलेलाही राज्यसभेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली, असे त्यांनी नमूद केले. महिला, शेतकरी, वारकरी व रुग्णांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या असून संत-महंतांना संरक्षण, वारकरी दिंडीसाठी अनुदान व विमा कवच देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. वारकऱ्यामध्ये विठ्ठल शोधणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्राने पाहिला असल्याचे वाघमारे यांनी म्हटले. अध्यक्षस्थानी माजी खासदार सदाशिवराव लोखंडे होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, महिला आघाडीच्या शिवसेना जिल्हाप्रमुख विमल पुंडे, युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव नवले, सर्जेराव कदम, शिवाजी जाधव, उपजिल्हाप्रमुख देवा लोखंडे, शिवसेना शहरप्रमुख अध्यक्ष अक्षय जाधव, सुभेदार शांतीलाल होन, देवा लोखंडे, अमोल औताडे, दिपक औताडे, प्रल्हाद सारंगधर, वैभव चव्हाण, घनश्याम वारकर, आरती गाडे, सुनील साळुंके, कृष्णा चोरगे, महेश देशमुख, दिगंबर पवार, रमेश काळे, साईनाथ जाधव,भारती शिंपी, वर्षा शिंगाडे, बाळासाहेब साळुंके, योगेश उशीर, विकास शर्मा, रवी भालेराव अदीसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी माजी खासदार लोखंडे यांनी नवीन मतदार नोंदणी वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे व संघटन बळकट करावे, असे आवाहन केले. जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी कोपरगावात प्रस्थापितांच्या विरोधात तत्त्वनिष्ठ राजकारण करत शिवसेनेची ताकद टिकवण्याची गरज व्यक्त केली. साखर कारखाने व शिक्षण संस्थांच्या प्रभावातही शिवसैनिक स्वाभिमानाने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघात माजी खासदार लोखंडे यांच्या पराभवामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शिवाजी जाधव यांनी केले.

कोपरगाव शहर : पक्षाचे काम न करता पदाचा दुरुपयोग करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांची पदे काढून घेण्यात येतील, असा स्पष्ट इशारा राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी दिला. कोपरगाव येथे पोहेगाव नागरी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण’ या तत्त्वावर पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे, असे आवाहन वाघमारे यांनी केले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले असून, सर्वसामान्य महिलेलाही राज्यसभेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली, असे त्यांनी नमूद केले. महिला, शेतकरी, वारकरी व रुग्णांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या असून संत-महंतांना संरक्षण, वारकरी दिंडीसाठी अनुदान व विमा कवच देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. वारकऱ्यामध्ये विठ्ठल शोधणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्राने पाहिला असल्याचे वाघमारे यांनी म्हटले.
अध्यक्षस्थानी माजी खासदार सदाशिवराव लोखंडे होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, महिला आघाडीच्या शिवसेना जिल्हाप्रमुख विमल पुंडे, युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव नवले, सर्जेराव कदम, शिवाजी जाधव, उपजिल्हाप्रमुख देवा लोखंडे, शिवसेना शहरप्रमुख अध्यक्ष अक्षय जाधव, सुभेदार शांतीलाल होन, देवा लोखंडे, अमोल औताडे, दिपक औताडे, प्रल्हाद सारंगधर, वैभव चव्हाण, घनश्याम वारकर, आरती गाडे, सुनील साळुंके, कृष्णा चोरगे, महेश देशमुख, दिगंबर पवार, रमेश काळे, साईनाथ जाधव,भारती शिंपी, वर्षा शिंगाडे, बाळासाहेब साळुंके, योगेश उशीर, विकास शर्मा, रवी भालेराव अदीसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी माजी खासदार लोखंडे यांनी नवीन मतदार नोंदणी वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे व संघटन बळकट करावे, असे आवाहन केले. जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी कोपरगावात प्रस्थापितांच्या विरोधात तत्त्वनिष्ठ राजकारण करत शिवसेनेची ताकद टिकवण्याची गरज व्यक्त केली. साखर कारखाने व शिक्षण संस्थांच्या प्रभावातही शिवसैनिक स्वाभिमानाने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघात माजी खासदार लोखंडे यांच्या पराभवामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शिवाजी जाधव यांनी केले.

COMMENTS