Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानपरिषदेसाठी विवेक कोल्हेंचे नाव येताच कोपरगावमध्ये जल्लोष

कोपरगाव : युवानेते विवेक कोल्हे यांना राज्याच्या विधान परिषदेसाठी भाजपाकडून उमेदवारी जाहीर असून या ऐतिहासिक निवडीबद्दल कोपरगाव मतदारसंघात विविध ठिकाणी मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी युवा नेते विवेक कोल्हे तसेच कोल्हे कुटुंबाच्या निष्ठेची दखल घेतली असून विवेक कोल्हे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. विवेक कोल्हेंसारख्या युवा व अभ्यासू नेतृत्वाला विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत असून या नव्या समीकरणामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,व कोअर कमिटी यांनी कोल्हे कुटुंबावर मोठा विश्वास दाखवत विधानपरिषदेची उमेदवारी युवा नेते विवेक कोल्हे यांना दिली आहे. दोन वर्षांपूर्वी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी  कोल्हे यांना दिल्लीला बोलावून महायुतीसाठी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत त्यांच्या पुढील राजकीय भवितव्यासाठी ठाम पाठीशी उभे राहण्याचे संकेत दिले होते.  काही महिन्यांपूर्वी कोपरगाव येथे पार पडलेल्या देशातील पहिल्या सीबीजी प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी देशाचे सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी प्रमुख नेत्यांनी विवेक कोल्हे यांना पक्षाकडून योग्य वेळी संधी दिली जाईल,असे संकेत दिले होते. त्यानुसार भाजपाने दिलेला शब्द पूर्ण करत नुकतीच युवा नेते विवेक कोल्हे यांची विधान परिषदेच्या सदस्यपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोपरगाव तालुक्यात तसेच मतदारसंघातील विविध भागांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. कोपरगावला दोन आमदार विवेक कोल्हे विधानपरिषदेवर गेल्यास कोपरगाव मतदारसंघाला दोन आमदार मिळणार आहेत. आ. आशुतोष काळे, हे विधासभेवर आमदार आहेत. आता विवेक कोल्हे यांना संधी मिळाल्यास कोपरगाव मतदार संघामध्ये दोन आमदार दिसतील. एक विधासभेवर प्रतिनिधित्व करेल तर एक विधानपरिषदेवर. त्यामुळे कोपरगावमध्ये यापुढे मोठे राजकीय गणिते पाहायला मिळतील असे म्हटले जात आहे.

महिला आरक्षण संबंधित विधेयक 54 मतांनी नामंजूर; बाजूने 298, विरोधात 230 मते; मोदी सरकार प्रथमच विधेयक मंजूर करण्यात अपयशी
ममतादीदींना अतिआत्मविश्‍वास नडला !
‘मी राजीनामा देणार नाही, आम्ही हरलोच नाही!’; बंगालमध्ये पराभवानंतरही ममता दीदींचा पवित्रा

कोपरगाव : युवानेते विवेक कोल्हे यांना राज्याच्या विधान परिषदेसाठी भाजपाकडून उमेदवारी जाहीर असून या ऐतिहासिक निवडीबद्दल कोपरगाव मतदारसंघात विविध ठिकाणी मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी युवा नेते विवेक कोल्हे तसेच कोल्हे कुटुंबाच्या निष्ठेची दखल घेतली असून विवेक कोल्हे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. विवेक कोल्हेंसारख्या युवा व अभ्यासू नेतृत्वाला विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत असून या नव्या समीकरणामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,व कोअर कमिटी यांनी कोल्हे कुटुंबावर मोठा विश्वास दाखवत विधानपरिषदेची उमेदवारी युवा नेते विवेक कोल्हे यांना दिली आहे. दोन वर्षांपूर्वी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी  कोल्हे यांना दिल्लीला बोलावून महायुतीसाठी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत त्यांच्या पुढील राजकीय भवितव्यासाठी ठाम पाठीशी उभे राहण्याचे संकेत दिले होते.

 काही महिन्यांपूर्वी कोपरगाव येथे पार पडलेल्या देशातील पहिल्या सीबीजी प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी देशाचे सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी प्रमुख नेत्यांनी विवेक कोल्हे यांना पक्षाकडून योग्य वेळी संधी दिली जाईल,असे संकेत दिले होते. त्यानुसार भाजपाने दिलेला शब्द पूर्ण करत नुकतीच युवा नेते विवेक कोल्हे यांची विधान परिषदेच्या सदस्यपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोपरगाव तालुक्यात तसेच मतदारसंघातील विविध भागांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.

कोपरगावला दोन आमदार

विवेक कोल्हे विधानपरिषदेवर गेल्यास कोपरगाव मतदारसंघाला दोन आमदार मिळणार आहेत. आ. आशुतोष काळे, हे विधासभेवर आमदार आहेत. आता विवेक कोल्हे यांना संधी मिळाल्यास कोपरगाव मतदार संघामध्ये दोन आमदार दिसतील. एक विधासभेवर प्रतिनिधित्व करेल तर एक विधानपरिषदेवर. त्यामुळे कोपरगावमध्ये यापुढे मोठे राजकीय गणिते पाहायला मिळतील असे म्हटले जात आहे.

COMMENTS