Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

दहावीच्या परीक्षे गणोरे केंद्रात आर्यन विवेक आंबरे प्रथम

अकोले: गणोरे (ता. अकोले) येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाचा विद्

तहसील कार्यालयासमोर कांदे ओतून आंदोलन; अकोलेत किसान सभेची जोरदार निदर्शने
दहीवीच्या परीक्षेत अगस्ती विद्यालयाची चमकदार कामगिरी
कर्जमाफी शासन आदेशाची अकोलेत होळी; किसान सभेचे राज्यव्यापी आंदोलन


अकोले: गणोरे (ता. अकोले) येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाचा विद्यार्थी आर्यन विवेक आंबरे याने 95.80 टक्के गुण मिळवत गणोरे केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. समृद्धी बबन एखंडे हिने 95 टक्के गुणांसह द्वितीय, तर वैष्णवी भीमाशंकर गडाख हिने 94.40 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
याशिवाय समृद्धी संदीप एखंडे हिने 90.20 टक्के गुणांसह चतुर्थ, तर सार्थक नितीन खतोडे याने 88.40 टक्के गुण मिळवत पंचम क्रमांक मिळविला. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत विद्यालयाच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली. विद्यालयातील 30 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, 32 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 18 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर 2 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध स्पर्धा परीक्षांमध्येही विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादन करून विद्यालयाची गौरवशाली परंपरा टिकवून ठेवली आहे. गणोरे केंद्रात प्रथम क्रमांक मिळवणारा आर्यन विवेक आंबरे हा गणोरे ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मच्छिंद्र आंबरे यांचा सुपुत्र आहे. त्याच्या या यशामुळे विद्यालयाच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

COMMENTS