जागतिकीकरणाच्या मूर्त स्वरूपाच्या शिल्पकाराची देशाने दखल घ्यावी !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागतिकीकरणाच्या मूर्त स्वरूपाच्या शिल्पकाराची देशाने दखल घ्यावी !

      साधारणपणे ऐंशीच्या दशकात जग हे जागतिकीकरणाच्या लाटेत ओढले गेले. जगाच्या दिपवून टाकणाऱ्या विकासाच्या दिशेने आणि दृष्टीने जगाच

राहुल गांधी आणि मणिपूर कथा ! 
जनगणनेच्या अभावाने !
माणसाला गुलाम करणारा बाजार !
The current image has no alternative text. The file name is: dakhal-2-1-1-1-1-1.png

      साधारणपणे ऐंशीच्या दशकात जग हे जागतिकीकरणाच्या लाटेत ओढले गेले. जगाच्या दिपवून टाकणाऱ्या विकासाच्या दिशेने आणि दृष्टीने जगाची झालेली वाटचाल अचंबित करणारी ठरली. खासकरून चीन सारख्या देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीकडे पाहिले तर या गोष्टीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. रस्ते, महामार्ग, पूल, बोगदे, काॅरिडाॅर अशा वैविध्यपूर्ण अभियांत्रिकी उभारणी हे वैशिष्ट्य भारतात आणि ते ही महाराष्ट्रासारख्या सामाजिक विचारसरणी अग्रेसर असणाऱ्या राज्यात भांडवली वैशिष्ट्यांनी नटलेल्या अशा प्रकल्पांना उभारणे ही केवळ आर्थिक, तंत्रज्ञानात्मक, राजकीयच आव्हान नव्हते तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन करून आखलेल्या प्रकल्पांना प्रत्यक्षात भौतिक स्वरूप देताना सामाजिक आव्हान ही मोठ्या प्रमाणात होते. मात्र, या आवाहनांना पेलणारं एक व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात आजही कार्यरत आहे; ज्या व्यक्तिमत्त्वाला देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीतील सर्वोच्च व्यक्तिमत्व म्हणून देशाने पहायला हवे. 

       महाराष्ट्राच्या वेगवान विकासामागे भक्कम पायाभूत सुविधा उभारणीचा मोठा वाटा आहे. रस्ते, पूल, एक्स्प्रेसवे, सागरी दुवे आणि मल्टी-मोडल कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांमुळे राज्याच्या आणि देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला गती मिळाली आहे. या सर्व प्रक्रियेत काही व्यक्तींनी धोरणात्मक नेतृत्व करत विकासाला दिशा दिली. त्यामध्ये अनिलकुमार गायकवाड यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या राज्यातील प्रमुख पायाभूत संस्था मध्ये त्यांनी व्यवस्थापकीय संचालक  जबाबदारी स्वीकारली. ही संस्था राज्यातील महामार्ग, एक्स्प्रेसवे आणि मोठ्या प्रकल्पांची अंमलबजावणी करणारी कणा मानली जाते.वर्सोवा-वांद्रे सी लिंक, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, पुणे रिंग रोड (पूर्व आणि विस्तार), जालना-नांदेड द्रुतगती मार्ग, मल्टी मॉडेल कॉरिडॉर, ठाणे खाडी पूल, एमएसआरडीसी बोगदे अशा विविध प्रकल्पांमधील व्यापक सहभाग त्यांनी दिला आहे. महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम आर्थिक जोडणीचा कणा असलेला समृध्दी महामार्ग हा स्वप्नवत असलेला प्रकल्प त्यांनी मूर्त स्वरूपात उभारुन महाराष्ट्राला अचंबित केले. या सर्व प्रकल्पांमध्ये त्यांची भूमिका केवळ तांत्रिक मर्यादेत नसून; प्रकल्प नियोजन, वित्तीय रचना, धोरणात्मक निर्णय, अंमलबजावणीवर देखरेख अशी बहुआयामी राहिली आहे.

     या सर्व प्रकल्पांमुळे राज्यातील वाहतूक वेळ आणि खर्च कमी झाला. उद्योग, शेती आणि व्यापारासाठी नवीन संधी निर्माण झाल्या. ग्रामीण आणि शहरी भागांमधील कनेक्टिव्हिटी सुधारली. महाराष्ट्राची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता वाढली. यातून स्पष्ट होते की त्यांचे योगदान केवळ अभियांत्रिकीपुरते मर्यादित नसून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाशी जोडलेले आहे.

     ‌ पायाभूत सुविधा उभारणीसारख्या क्षेत्रात दीर्घकालीन आणि व्यापक परिणाम घडवणारे नेतृत्व हे तितकेच महत्त्वाचे आहे जितके इतर क्षेत्रांतील योगदान. अनिलकुमार गायकवाड यांची वैशिष्ट्ये जर आपण विचारात घेतली तर, दीर्घकालीन प्रकल्पांमध्ये सातत्यपूर्ण सहभाग, राज्यस्तरीय संस्थांमध्ये सर्वोच्च नेतृत्व, बहुविध पायाभूत प्रकल्पांमध्ये धोरणात्मक भूमिका, विकासाला थेट गती देणारे निर्णय इतक्या महत्त्वाच्या भूमिका त्यांनी निभावल्या आहेत. आज महाराष्ट्र ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्यामागे अशा दूरदृष्टी असलेल्या प्रशासकीय आणि तांत्रिक नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. अनिलकुमार गायकवाड यांचे कार्य या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. देशाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या पायाभूत क्षेत्राला योग्य प्रतिष्ठा देण्याची गरज आहे. अनिलकुमार गायकवाड यांनी अनेक महत्त्वाच्या कामातुन आपली ओळख निर्माण केली आहे. त्यापैकी पुणे -मुंबई एक्स्प्रेस वे, मुंबईतील सी-लिंक पुल, मुंबई आणि ठाणे शहरातील जवळपास सर्व उड्डाण पुले, समृद्धी एक्स्प्रेस वे, मुंबई मधील विलासराव देशमुख फ्री वे, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचे आधुनिकीकरण केलेली ईमारत, मुंबई हायकोर्ट इमारत दुरुस्ती, हाई माऊंट बिल्डिंग, सह्याद्री इमारत, विशेष म्हणजे देशाच्या राजधानी दिल्ली येथील नविन “महाराष्ट्र सदन”, नुकतेच लातुर जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धाटन केलेले देशातील पहिले नवीन टेक्नॉलॉजीचे हायब्रीड पुल, देशातील नदीवर तयार केलेले सर्वांत उंच लोखंडी पुल, देशातील सर्वाधिक लांब असा आठ किलोमीटर चा बोगदा, अशी अनेक महत्त्वाकांक्षी कामे गायकवाड यांच्या कार्यकाळात त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे हाताळली आहेत. अशा या जागतिकीकरणाचे मूर्त स्वरूप भारतात साकारणाऱ्या शिल्पकाराच्या  या असामान्य कार्याची देशाने ‘दखल’ घ्यावी, असं आम्हाला मनापासून वाटतं!

COMMENTS